Advertisement

'टकाटक' भूमिकेत प्रथमेश परब

गुढीपाडव्याचा आणि नववर्षाचा मुहूर्त साधत 'टकाटक' असं शीर्षक असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रथमेश एका 'टकाटक' भूमिकेत दिसणार आहे.

'टकाटक' भूमिकेत प्रथमेश परब
SHARES

गुढीपाडव्याचा आणि नववर्षाचा मुहूर्त साधत 'टकाटक' असं शीर्षक असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रथमेश एका 'टकाटक' भूमिकेत दिसणार आहे. 


मुख्य भूमिका

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब लवकरच एका पेक्षा एक हटके भूमिकांमध्ये प्रेक्षकांना भेटणार आहे. मराठीसोबतच हिंदीतही पाय रोवू पाहणारा प्रथमेश आता एका 'टकाटक' भूमिकेत रुपेरी पडद्यावर चमकणार आहे. 'बालक पालक' आणि 'टाइमपास'सारखे सिनेमे करत थेट हिंदीत अजय देवगणसोबत 'दृश्यम' करणाऱ्या प्रथमेशनं दिग्दर्शक मिलिंद कवडेच्या 'टकाटक' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.


गंमतीशीर कथा-पटकथा 

हिंदू नूतन वर्षाच्या पहिल्या सायंकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'टकाटक'चं फर्स्ट पोस्टर मराठी रसिकांच्या भेटीस आणण्यात आलं आहे. 'येड्यांची जत्रा', '४ इडियट्स', 'जस्ट गंमत', 'शिनमा' आणि '१२३४' या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा मिलिंद 'टकाटक'च्या माध्यमातून काहीसा वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मिलिंदनं अजय ठाकूर यांच्यासोबत या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली असून, संवाद संजय नवगीरे यांचे आहेत.


२८ जूनला प्रदर्शित 

सेक्स काॅमेडी हा प्रकार मराठी प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षक पूर्वी 'अॅडल्ट्स ओन्ली' असं होतं. नंतर ते बदलून 'हृदयी वसंत फुलताना' असं ठेवण्यात आलं, पण अखेर 'टकाटक' हे शीर्षक निश्चित करून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांसमोर आणण्यात आलं आहे. त्यासोबतच २८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचंही घोषित करण्यात आलं आहे. पर्पल बुल एन्टरटेन्मेंट प्रा. लि., व्ही, पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली 'टकाटक'ची निर्मिती करण्यात आली आहे. 


सेक्स काॅमेडी 

या चित्रपटात एका वेगळ्या धाटणीची सेक्स काॅमेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल असं मिलिंदचं म्हणणं आहे. फुल टू कमर्शियल चित्रपट असलेल्या 'टकाटक'मध्ये मनोरंजनाचे सर्व मसाले असून, प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही यात दडल्याचं मिलिंदचं म्हणणं आहे. आजतागायत बऱ्याच आशयघन चित्रपटांची यशस्वी निर्मिती करत मराठी सिनेसृष्टीच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी 'टकाटक'ची निर्मिती केली आहे. 


लक्षणीय व्यक्तिरेखा 

या चित्रपटातील प्रथमेशच्या भूमिकेबाबत इतक्यात काहीही सांगण्यात आलेलं नाही, पण आजवरच्या भूमिकांप्रमाणेच 'टकाटक'मधील प्रथमेशची व्यक्तिरेखाही लक्षणीय असेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रथमेशसोबत या सिनेमात ऋतिका श्रोत्री ही अभिनेत्री झळकणार आहे. याशिवाय अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर हे कलाकारही या चित्रपटात विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत.



हेही वाचा -

बायको शोधणाऱ्या नवरदेवाची झलक पाहिली का?

खलनायकी भूमिकेत सुप्रित निकम




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा