Advertisement

खलनायकी भूमिकेत सुप्रित निकम

मूळचा सांगलीचा असलेला सुप्रित जवळपास मागील १२ वर्षांपासून नाटकांमध्ये काम करत आहे. 'H2O'खेरीज सुप्रितच्या भूमिका असलेले 'बोनस', 'कटिबंध', 'ईमेल-फिमेल' हे मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सुप्रितनं 'बोनस'मध्ये केळ्या नावाची मजेशीर भूमिका केली आहे,

खलनायकी भूमिकेत सुप्रित निकम
SHARES

आजवर बऱ्याच नायकांनाही खलनायकी भूमिकांचा मोह झाल्याचं आपण पाहिलं आहे. नायक साकारता साकारता एखादा अभिनेता मध्येच एखादी खलनायकी भूमिका साकारतो आणि प्रेक्षकांनाही ती आवडते. सुप्रित निकम हा असाच एक काहीसा प्रेक्षकांच्या परिचयाचा असलेला चेहरा आता खलनायकी भूमिकेत दिसणार आहे.


H2O मध्ये खलनायक

सुप्रितबाबत सांगायचं तर त्यानं यापूर्वी नाटक, चित्रपट, मालिका आणि जाहिरातींतून अभिनय केला आहे. 'नकळत सारे घडले',  'सरस्वती' या गाजलेल्या मालिकांमध्ये छोटया, पण लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारणारा सुप्रित केवळ नाटक आणि मालिकांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही, तर त्यानं 'विठ्ठला शप्पथ' या मराठी चित्रपटातही अभिनय केला आहे. याच सुप्रितनं आता 'H2O' या आगामी मराठी चित्रपटात खलनायक साकारला आहे.


धमाल कॅरेक्टर 

मूळचा सांगलीचा असलेला सुप्रित जवळपास मागील १२ वर्षांपासून नाटकांमध्ये काम करत आहे. 'H2O'खेरीज सुप्रितच्या भूमिका असलेले 'बोनस', 'कटिबंध', 'ईमेल-फिमेल' हे मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सुप्रितनं 'बोनस'मध्ये केळ्या नावाची मजेशीर भूमिका केली आहे, तर 'कटिबंध'मध्ये संत नरहरी सोनार यांच्या मोठ्या मुलाची मालूची भूमिका साकारली आहे. 'H2O' खेरीज 'विठ्ठला तूच' या आगामी चित्रपटातही तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय लवकरच तो एका कन्नड चित्रपटामध्येही दिसणार आहे. 'H2O'मधील खलनायक म्हणजे काहीसं धमाल कॅरेक्टर आहे.


पाण्याची लढाई

पर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभं राहणार आहे. अशाच एका गंभीर विषयावर भाष्य करणारा मराठी चित्रपट म्हणजे 'H2O'. यात प्रेक्षकांना पाण्याची लढाई पाहायला मिळेल. जी मानसिकही असेल आणि शारीरिकही... मिलिंद पाटील दिग्दर्शित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



हेही वाचा -

१४ वर्षांनी नीना कुळकर्णी पुन्हा बनल्या स्वप्नीलची आई

सयाजी-किशोरच्या ‘बाबो’चा फर्स्ट लुक पाहिला का?





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा