Advertisement

सयाजी-किशोरच्या ‘बाबो’चा फर्स्ट लुक पाहिला का?

‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना इथं फुल वाव’ असं या चित्रपटाचं मजेशीर वर्णन करता येईल. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे हास्यवीर ‘बाबो’ या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सयाजी-किशोरच्या ‘बाबो’चा फर्स्ट लुक पाहिला का?
SHARES

काही सिनेमे केवळ मोठ्या कलाकारांच्या असण्यानं चर्चेत राहतात. तर काही एखाद्या मातब्बर दिग्दर्शकामुळं. ‘बाबो’ हा आगामी मराठी सिनेमा मराठीतील दोन दिग्गज अभिनेत्यांमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. सयाजी शिंदे आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बाबो’चा फर्स्ट लुक पाहिला का?


आघाडीचे हास्यवीर एकत्र

यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित 'बाबो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना इथं फुल वाव’ असं या चित्रपटाचं मजेशीर वर्णन करता येईल. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे हास्यवीर ‘बाबो’ या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.


३१ मे ला प्रदर्शित

‘बाबो’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे. आजवर अनेक मनोरंजक भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची मांदियाळी या चित्रपटात आहे. या नमुनेदार गावातील नमुन्यांची ओळख नुकतीच सोशल मिडीयावर करून देण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, संवेदनशील कवी, अभिनेते किशोर कदम यांच्यासह भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, प्रतिक्षा मुणगेकर, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर, रमेश चौधरी, विनोद शिंदे, अमोल कागणे, मंजिरी यशवंत, स्मिता डोंगरे, प्रिया उबाळे, अरुण शिंदे, पुष्पा चौधरी, प्रकाश भागवत, वैशाली दाभाडे, आकाश घरत आदी कलाकार या चित्रपटात आहेत. हा चित्रपट ३१ मे २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

मोठ्या पडद्याकडं वळली साईंकितची पावलं

पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य सांगणार 'बलोच'!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा