Advertisement

'बाळा' करणार चौकार-षटकारांची आतषबाजी!

चित्रपटसृष्टी आणि क्रिकेटचं खूप जवळचं नातं आहे. त्यामुळंच क्रिकेटसोबतच क्रिकेटर्सवर बऱ्याच अभिनेत्री फिदा असल्याचं आपण पाहिलं आहे. याखेरीज रुपेरी पडद्यावरही बऱ्याचदा क्रिकेट पाहायला मिळालं आहे. याच क्रिकेटच्या विषयावर आधारलेला 'बाळा' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

'बाळा' करणार चौकार-षटकारांची आतषबाजी!
SHARES

सध्या सुरू असलेली आयपीएल स्पर्धा आणि त्यानंतर येणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. संघ कोणताही असला तरी संध्याकाळ झाली की सध्या घरोघरी क्रिकेटचे सामने सुरू होतात आणि छोट्या पडद्यावरील चौकार-षटकारांगणिक टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षाव होतो. आता चौकार-षटकारांची ही आतषबाजी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावरही पाहायला मिळणार आहे.


चिमुरड्याची गोष्ट

चित्रपटसृष्टी आणि क्रिकेटचं खूप जवळचं नातं आहे. त्यामुळंच क्रिकेटसोबतच क्रिकेटर्सवर बऱ्याच अभिनेत्री फिदा असल्याचं आपण पाहिलं आहे. याखेरीज रुपेरी पडद्यावरही बऱ्याचदा क्रिकेट पाहायला मिळालं आहे. याच क्रिकेटच्या विषयावर आधारलेला 'बाळा' हा  मराठी  चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. क्रिकेटला आपलं सर्वस्व मानणाऱ्या एका चिमुरड्याची गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित करण्यात आली आहे. 


३ मे रोजी प्रदर्शित

उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. प्रथमच कॅमेरा फेस करणाऱ्या मिहीरीशनं या चित्रपटाच्या माध्यमातून क्रिकेटचा डाव मांडला आहे. यासाठी त्यानं प्रचंड मेहनत केली असून, क्रिकेटचा कसून सरावही केल्याचं समजतं. त्यामुळे एक नवोदित बालकलाकार रुपेरी पडद्यावर कशाप्रकारे फटकेबाजी करतो ते पाहायला मजा येणार आहे. यश अँड राज एंटरटेंन्मेट या बॅनरखाली राकेश सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ३ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या 'बाळा'चं लेखन व दिग्दर्शन सचिंद्र शर्मा यांनी केलं आहे.



हेही वाचा -

'टकाटक' भूमिकेत प्रथमेश परब

बायको शोधणाऱ्या नवरदेवाची झलक पाहिली का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा