मानसी म्हणतेय ‘मला लगीन करायचं’

Andheri
मानसी म्हणतेय ‘मला लगीन करायचं’
मानसी म्हणतेय ‘मला लगीन करायचं’
मानसी म्हणतेय ‘मला लगीन करायचं’
See all
मुंबई  -  

अंधेरी - काही दिवसांपासून मानसी नाईक लग्न करतेय का? मानसी नाईक लग्नाच्या बेडीत अडकतेय का? मानसी कोणाशी लग्न करतेय? अशी कुजबूज मनोरंजन क्षेत्रात सुरु होती. मानसीच्या लगीनघाईचा खुलासा नुकताच उलगडला तो ‘मला लगीन करायचं’ या म्युझिक अल्बमच्या प्रकाशन सोहळ्यात. नानूभाई जयसिंघानी यांच्या ‘व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘मला लगीन करायचं’ या धमाकेदार म्युझिक अल्बमच्या निमित्ताने रंगलेला मानसीच्या लग्नाचा अनोखा प्रमोशन फंडा सुपरहिट ठरला असून, हे गाणं प्रदर्शनापूर्वीच खूप लोकप्रिय ठरलंय. बुधवारी ८ मार्च ला या अल्बमचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईतल्या अंधेरीमध्ये हार्ड रॉक कॅफे मध्ये पार पडला. या म्युझिक अल्बमच्या प्रकाशनासाठी त्यांची संपूर्ण टीम लग्नाच्या थाटामाटात अवतरली होती.

या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे यात ‘डान्सिंग क्वीन’ मानसी नाईक सोबत ‘कॉमेडी बादशहा’ जॉनी लिवर आणि ‘डीआयडी’ फेम सिद्धेश पै या तिघांनी प्रथमच एकत्र ताल धरला आहे. शिवाय जॉनी लिवर यांनी प्रथमच मराठी रॅप स्टाईलमध्ये ‘मला लगीन करायचं’ या गीताचा मुखडा गायला आहे. तिघांच्या जुळून आलेल्या केमेस्ट्रीमुळे हा अल्बम खूपच देखणा झालाय. मराठी आणि पाश्चिमात्य संगीताच्या फ्यूजनमध्ये काहीतरी नवीन करायचं या विचारातून या गीताची निर्मिती झाली आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तूत ‘मला लगीन करायचं’ या अल्बमची निर्मिती, दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी अशी तिहेरी जबाबदारी सिद्धेश पै यांनी सांभाळली आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मानसी नाईकने या गीतात जॉनी, सिद्धेश आणि 12 डान्सर मुलींसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला आहेच; शिवाय या गीतातील प्रत्येकाचे लूक आणि स्टाईल डिझाईन केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.