Advertisement

‘धिंगाणा’ चित्रपटाचं धमाकेदार म्युझिक लाँच!


‘धिंगाणा’ चित्रपटाचं धमाकेदार म्युझिक लाँच!
SHARES

हिंदी मराठीतील कलाकारांनी मिळून घातलेला ‘धिंगाणा’ येत्या डिसेंबरपासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. धमाल कथानक, कलाकारांची भन्नाट अदाकारी, ठेका धरायला लावणारं संगीत असा करमणुकीचा भरगच्च मसाला असणाऱ्या ‘धिंगाणा’ या मराठी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर व म्युझिक लाँच सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सिनेमाचे निर्माते समीर सदानंद पाटील असून दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांचे आहेत.




आनंद शिंदे यांनी या चित्रपटात ‘धिंगाणा’ हे चित्रपटाचे शीर्षक गीत गायले असून या गीताची निर्मिती सचिन पाठक यांच्या लेखणीतून झालेली आहे. या गीताला अमितराज यांनी संगीतबद्ध केलेले आहे. आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील ‘झिंगालाला’ हे गीत गायले असून या गीताची रचना वैभव जोशींनी केली आहे. तसेच, या चित्रपटातील वेगळ्या धाटणीचे व युवा वर्गाला भावणारे ‘बिल्ली हुँ मै’! हे हिंदी, मराठी, आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतील गाणे जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारले आहे. राज्ञी त्यागराज या नवोदित गायिकेला शशांक पोवार या संगीतकाराने प्रथमत: सिनेमात गाण्याची संधी दिली असून राज्ञी त्यागराज हिने या संधीचे सोने केले आहे.




धिंगाणा’चं दिग्दर्शन करणाऱ्या चंद्रकांत दुधगावकर यांनी या सिनेमातून चीट फंड घोटाळ्याचा विषय हाताळला आहे. हेमंत एदलाबादकर यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर, प्रकाश धोत्रे या मराठी कलाकारांसोबत रझा मुराद, शाहबाज खान, अवतार गिल, कुनिका हे हिंदीतले कलाकारही या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला ‘धिंगाणा’ ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा