Advertisement

सिनेमागृहात वाजणार मशिदीवरील ‘भोंगा’?

प्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी नेहमीच आव्हानात्मक तसंच वादग्रस्त विषयांवर सिनेमा बनवण्याचं धाडस केलं आहे. पाटील आता सिनेमागृहात ‘भोंगा’ वाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सिनेमागृहात वाजणार मशिदीवरील ‘भोंगा’?
SHARES

काही दिग्दर्शकांना आव्हानात्मक सिनेमा बनवण्याचं जणू वेडच असतं. मराठीपासून हिंदीपर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांचाही अशा दिग्दर्शकांच्या यादीत विशेषत्वाने समावेश करावा लागेल. कारण पाटील यांनी नेहमीच आव्हानात्मक तसंच वादग्रस्त विषयांवर सिनेमा बनवण्याचं धाडस केलं आहे. पाटील आता सिनेमागृहात ‘भोंगा’ वाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.


पुन्हा एक नवं धाडस….

‘धग’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरल्यानंतर पाटील यांनी ‘आॅक्टोबर ३१’ या हिंदी सिनेमात १९८४ मधील वादग्रस्त घटनेवर प्रकाश टाकला. त्यानंतर आलेल्या ‘हलाल’ या सिनेमा्दवारे मुस्लिम धर्मातील हलाला या नियमातील चांगल्या-वाईट गोष्टी पडद्यावर सादर केल्या. त्यामुळे आगामी ‘भोंगा’ या सिनेमात ते नेमका कोणता विषय मांडणार? याबाबत उत्सुकता वाढणं सहाजिक आहे.
संवेदनशील विषयावर भाष्य…

हा ‘भोंगा’ आहे मशिदीवरील... या सिनेमाचा विषय खूप संवेदनशील असल्याने सध्या याबाबतची माहिती देण्याचं टीमच्या वतीने टाळलं जात आहे. परंतु ‘मुंबई लाइव्ह’ला मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाचा विषय अजानशी निगडीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं की, एका लहान मुलाच्या अनुषंगाने मशिदीवरील भोंग्याभोवती या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. मशिदीवरील भोंग्यांमुळे आसपासच्या लोकांना होणारा त्रास, त्याला होणारा विरोध आणि एकूणच केलं जाणारं राजकारण यांचा खेळ पाटील यांनी या सिनेमात मांडला आहे.


महाजन यांचं साहस…

कपिल कांबळे, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, दिप्ती धोत्रे, दिलीप डोंबे, आकाश घरत, महेंद्र तिसगे आदी कलाकार या सिनेमात आहेत. सय्यद अख्तर आणि शिवाजी पाटील या दोघांनी हा सिनेमा लिहिला आहे. अत्यंत धाडसी आणि वादग्रस्त विषय असलेल्या या सिनेमाची निर्मिती अरुण हिरामण महाजन यांनी केली आहे. नलिनी प्रोडक्शनने या सिनेमाच्या प्रस्तुतीची जबाबदारी स्वीकारली आहे. रामाणी दास यांनी या सिनेमाचं छायांकन केलं असून, संकलन निलेश गावंड यांचं आहे. गीतकार सुबोध पवार यांनी लिहिलेल्या गीतांना गायक-संगीतकार विजय गटलेवारने संगीत दिलं आहे.


पोस्ट-प्रोडक्शन सुरू…

मालेगाव आणि मालेगावजवळील मांजुर्णे गावात या सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण करण्यात आलं आहे. सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झालं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. ‘भोंगा’ या सिनेमाच्या निमित्ताने शिवाजी पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विषयाला हात घातला असून, कदााचित या सिनेमामुळे वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटील आणि त्यांची टीम या समस्यांना कशा प्रकारे सामोरे जाऊन ‘भोंगा’ प्रदर्शित करते हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.हेही वाचा-

खलनायकी भूमिकेचा ‘अमृता’नुभव

प्रेक्षकांना 'मस्का' लावण्याचा चांगला प्रयत्नसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा