मानसी म्हणतेय ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची'!

Mumbai  -  

रमेश व्यंकय्या गुर्रम निर्मित प्रेमा या मराठी सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.याप्रसंगी चित्रपटाच्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. या चित्रपटात एक ठसकेबाज आयटम साँगही प्रेक्षकांना ऐकायला आणि पहायला मिळणार आहे. 'मी गुलाबी नोट दोन हजाराची’ असे त्या गाण्याचे बोल असून या आयटम साँगवर मानसी नाईक आपल्याला थिरकताना पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील सर्व गाणी शेखर आनंदे यांनी लिहिली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.व्हिडिओग्राफर - विनीत पेडणेकरLoading Comments