अहो मिस वर्ल्ड..हे काय !

  Andheri
  अहो मिस वर्ल्ड..हे काय !
  मुंबई  -  

  मुंबई - बॉलिवूडची पिगी चॉप्स अर्थात प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा खिताब पटकावलाय. मात्र प्रियांकाचं जनरल नॉलेज जर तुम्ही पाहिलंत, तर तुमचा यावर विश्वासच बसणार नाही. कॉफी वुईथ करण या कार्यक्रमात आलेल्या प्रियांकानं करणच्या प्रश्नांना उत्तरं देताना तेच सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळे आलिया भट्टवर आत्तापर्यंत होत असलेले विनोद लवकरच प्रियांकावरही सुरू होतील अशीच शक्यता आहे.

  करणने विचारलेल्या तीन प्रश्नांमध्येच प्रियांकाची विकेट उडाली. पहिला प्रश्न होता भारतातल्या तीन मुगल राज्यकर्त्यांची नावं सांग. प्रियांकाचं उत्तर - अर्रे बाबा!. आता काय म्हणावं याला!

  करणचा दुसरा प्रश्न होता तीन मराठा राजांची नावं सांग. यावर प्रियांकाचं उत्तर - एक मोठा हशा. आणि तिसरा प्रश्न होता भारताच्या तीन पंतप्रधानांची नावं सांग. यावर आपल्या पिगी चॉप्सचं उत्तर काय, तर पुन्हा हशा. आता काय म्हणावं या आपल्या मिस वर्ल्डला!

  यावेळी लग्नाबद्दलच्या प्रश्नांना मात्र प्रियांकानं थेट उत्तरं दिली. करण जोहरच्या ‘कॉफी वुईथ करण’च्या पाचव्या सीजनमध्ये प्रियांका एकटीच आली होती. करण नेहमीच अविवाहित अभिनेत्रींना लग्न कधी करणार हा प्रश्न विचारतोच. त्याप्रमाणे त्यानं या वेळी प्रियंकालाही असाच प्रश्न विचारला. प्रियांका म्हणाली, "लिहिणारे लिहीत रहातील. मात्र जेव्हा माझ्या बोटात अंगठी दिसेल तेव्हा संपूर्ण जगासमोर ते जाहीर होईलच. तोपर्यंत मी सिंगलच आहे."

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.