Advertisement

२०२२ च्या पद्म पुरस्काराची घोषणा, पाहा संपूर्ण यादी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच अशा पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

२०२२ च्या पद्म पुरस्काराची घोषणा, पाहा संपूर्ण यादी
SHARES

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच अशा पद्म पुरस्काराची (Padma Awards 2022) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून यंदा ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तसंच सीरमसंस्थेचे सायरस पुनवाला यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मनोरंजन क्षेत्रातून सुलोचना चव्हाण आणि सोनू निगम यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहे.

पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पद्म पुरस्कारांमध्ये यावेळी पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीओ जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाले आहे.

एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण

कला - प्रभा अत्रे

पद्मभूषण

उद्योग - नटरंजन चंद्रशेखरन

आरोग्य - सायरस पुनवाला

पद्मश्री

आरोग्य - हिंमतराव बावस्कर

आरोग्य - विजयकुमार विनायक डोंगरे

कला - सुलोचना चव्हाण

कला - सोनू निगम

विज्ञान आणि इंजिनियरिंग - अनिलकुमार राजवंशी

आरोग्य - भीमसेन सिंघल

आरोग्य - बालाजी तांबे (मरणोत्तर)



हेही वाचा

‘कोन नाय कोन्चा’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा