Advertisement

‘कोन नाय कोन्चा’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल

या याचिकेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘कोन नाय कोन्चा’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल
SHARES

‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (varan bhat loncha kon nai koncha) हा चित्रपट त्यातील काही दृश्यांमुळे वादात सापडला आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेनं (bharatiy stree shakti sanghatana) या चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (mumbai high court Nagpur Bench) जनहित याचिका (Petition) दाखल केली आहे.

या याचिकेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’या चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतेय.

भारतीय स्त्री शक्ती संघटनेनं ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखवण्यात आलंय. अशा दृश्यांवर आक्षेप घेत या संघटनेनं चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

ज्येष्ठ नाटककार, ज्यांचं नुकतंच निधन झालंय, त्या जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असल्याची माहिती आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला.

‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडलाय. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांमुळे महिला आयोगानं पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवण्यात आला.हेही वाचा

नार्को क्वीन शशिकला पाटणकर यांच्या आयुष्यावर वेब सिरीज

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा