व्याधीग्रस्त व्यक्तींनी साकारल्या कलाकृती

 Kala Ghoda
व्याधीग्रस्त व्यक्तींनी साकारल्या कलाकृती
व्याधीग्रस्त व्यक्तींनी साकारल्या कलाकृती
व्याधीग्रस्त व्यक्तींनी साकारल्या कलाकृती
व्याधीग्रस्त व्यक्तींनी साकारल्या कलाकृती
See all
Kala Ghoda, Mumbai  -  

काळाघोडा - द आर्ट ट्रिसोमी 21 या प्रदर्शनात, डाउन सिंड्रोम आणि इतर शारिरीक विकासाच्या व्याधींनी त्रस्त असलेल्या तरुणांनी कला सादर केली. ओम क्रिएशन ट्रस्टतर्फे या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनाचे उदघाटन अॅक्सिस बॅंकेच्या उपाध्यक्षा अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ उपस्थित होते. काळाघोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयातील कुमारस्वामी हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये 200पेक्षा अधिक छायाचित्र आणि कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनापासून मिळणारा नफा हा ओम क्रिएशन्सच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. "आम्ही सतत विशेष व गतिमंद महिलांसाठी काम करत असतो. त्यांचे नशीब घडवणे आणि कलेच्या क्षेत्रात त्यांचा प्रवास अधिक चांगला होण्यासाठी मदत करणे, हेच आमचे ध्येय आहे", असे ओम क्रिएशनच्या संस्थापिका डॉ. राधिका खन्ना यांनी सांगितले.

Loading Comments