Advertisement

विनीत भोंडे बनला मराठी बिग बॉसच्या घराचा गाईड!


विनीत भोंडे बनला मराठी बिग बॉसच्या घराचा गाईड!
SHARES

बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची उत्सुकता आणि इच्छा प्रत्येकाची असते. पण १०० दिवस तिथे रहाणं हे काही सोपं नाही. कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या ग्रँड प्रीमिअरला विनीत भोंडेंची मंचावर एन्ट्री झाल्यानंतर त्याला एक सुंदर सरप्राईझ मिळालं. महेश मांजरेकर यांनी विनीत भोंडे यांच्या पत्नीला मंचावर बोलावलं. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याअगोदर त्याची पत्नी खास त्याला भेटण्यासाठी मंचावर आली होती.


'माझ्या बायकोमुळेच या मंचावर!'

विनीतचं नुकतंच लग्न झालं असून त्याला लग्नानंतर काही दिवसातच बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची विचारणा झाली. पण, लग्न झाल्यानंतर लगेचच इतके दिवस बायकोपासून दूर कसं रहाणार? हा प्रश्न समोर होताच. पण बायकोने कामाला प्राधान्य दिले आणि मला कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी पाठिंबा दिला. मी माझ्या बायकोमुळेच या मंचावर आहे, असं ते म्हणाले. विनीतच्या बायकोने त्याला एक छानसा कुटंबासोबतचा फोटो घरी घेऊन जायला दिला. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाणारा दुसरा सदस्य होता, त्याआधी रेशम टिपणीस घरामध्ये गेली होती.



विनीत झाला गाईड

विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाताच त्याला घरातील प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल आहे हे दिसून आले आणि प्रत्येक गोष्टी तो खूपच बारकाईने बघत होता. घरात जाताच तो स्वयंघोषित गाईड झाला. त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक सदस्याला त्याने स्वत: बिग बॉसचं घर दाखवलं. घरातील प्रत्येक कोपऱ्याला आणि प्रत्येक भागाला त्याने खूपच गमतीशीर प्रकारे प्रत्येकाला दाखवलं. विनीतचे प्रश्न, त्याचा हजरजवाबीपणा, त्याचा मिश्कील स्वभाव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही! विनीतचा हा मिश्किलपणा बिग बॉसच्या घरात रंगत आणणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा

मराठी 'बिग बाॅस'चं ग्रॅण्ड ओपनिंग


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा