Advertisement

Live: मराठी 'बिग बाॅस'चं ग्रॅण्ड ओपनिंग


Live: मराठी 'बिग बाॅस'चं ग्रॅण्ड ओपनिंग
SHARES

जगभरातील, मराठी प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होते असा मनोरंजनाचा तिसरा डोळा म्हणजे मराठी 'बिग बाॅस'च्या ग्रॅण्ड अोपनिंगला रविवारी संध्याकाळी ७.०० वाजता सुरूवात झाली.


१०.२० पडद्यावर राजकारण्याची दमदार भूमिका साकारणारा अभिनेता राजेश श्रृंगारपुरे आणि सुशांत शेलार बिग बाॅसच्या घरात, दोघेजण बिग बाॅसच्या घरात काय राजकारण करणार?


१०.०८ 'रात्रीस खेळ चाले' फेम ऋतुजा धर्माधिकारी बिग बाॅसच्या घरात, ऋतुजाला घाबरणार का बिग बॉसचे स्पर्धक?

पुष्कर जोग करणार 'जबरदस्त' मज्जा

१०.०० अभिनेता, अॅंकर पुष्कर जोग आणि 'किस किस को प्यार करू' सिनेमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणारी सई लोकूर या तिसऱ्या जोडीची बिग बाॅसमध्ये धमाकेदार एण्ट्री, 


९.१५ अभिनेत्री मेघा धाडेची बिग बाॅसच्या घरात एण्ट्री



९.२५ सगळ्यात तरुण स्पर्धक ७२ वर्षीय उषा नाडकर्णी बिग बॉस च्या घरात, घरात उषा होणार का सगळ्यांची आऊ?


९.०० बिग बाॅसच्या घरात भूषण कडू आणि आरती सोलंकी या दुसऱ्या जोडीचं आगमन



८.३० बोल्ड स्मिता गोंदकर बिग बॉसच्या घरात, 'पप्पी दे पप्पी दे' फेम स्मिता बिग बॉसमध्ये घालणार का गोंधळ?


८.२० 'माझ्यासारखा मीच' असं म्हणत अवलिया पत्रकार अनिल थत्ते यांची बिग बाॅसच्या वाड्यात एण्ट्री, थत्ते करतात स्वतःच ब्रँडिंग. आता स्टार आहे. बिग बॉस जिंकल्यावर मी सुपर स्टार होईन- अनिल थत्ते


८.०५  बिग बाॅसच्या घरात आस्ताद काळे आणि जुई गडकरी या पहिल्या जोडीचं आगमन

७.५५ विनीतच्या बायकोने दिलं फोटोफ्रेम गिफ्ट


७.४५ चला हवा येऊ द्या फेम विनीत भोंडेचं बिग बाॅसच्या घरात अागमन

७.३० रेशमचा बिग बॉसच्या घरात गृहप्रवेश, साधू लागली बिग बाॅससोबत संवाद


७.२२ बिग बाॅसच्या घरातली पहिली स्पर्धक- अभिनेत्री रेशम टिपणीस

७.२१ बिग बाॅसच्या घरात आहे 'बा'चा टीव्ही, या टीव्हीवरून बिग बॉस घेणार स्पर्धकांची शाळा

७.२० घरातील प्रत्येक सदस्याला गळ्यात माइक घालणं बंधनकारक


७.१७ मराठमोळ्या वाड्यात ५० नाइट व्हिजन कॅमेरे

७.१५ बिग बाॅसच्या घर म्हणजे मराठमोळा वाडा, भिंतीवर कोल्हापुरी चपलांची डिझाईन



७.१० बिग बॉसच्या घराचं प्रेक्षकांना दर्शन

७.०५ नारळ फोडून बिग बॉस च्या घरात मांजरेकरांनी घेतली एन्ट्री

७.०० मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनच्या प्रीमियरला सुरुवात


स्पर्धकांची नावं कळली 

'बिग बाॅस' मराठीत सुरू होणार म्हटल्यावर या कार्यक्रमात स्पर्धक कोण असतील? शोचा होस्ट कोण असणार? यावरून चर्चा रंगल्या होत्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार यावरून पडदा दूर झाला असला, तरी स्पर्धकांबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानंतर एक-एक करत त्यावरून पडदा दूर झाला.



किती स्पर्धक?

एकूण १५ स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये एण्ट्री करणार आहेत. त्यामुळे येणारे १०० दिवस ते कसे एकत्र राहतील, त्यांच्यात काय रुसफे-फुगवे होतील हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी, किस्से प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणार हे नक्की. 



हेही वाचा-

एंटरटेन्मेंटचा 'बिग बॉस' आता मराठीत!

इथे दिसतं तसंच असतं! 'बिग बॉसचा' पहिला सीझन १५ एप्रिलपासून



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा