इथे दिसतं तसंच असतं! 'बिग बॉसचा' पहिला सीझन १५ एप्रिलपासून

बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण कलाकार असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. इथे दिसतं...तसंच असतं ! असं म्हणत “बिग बॉसचा” पहिला सिझन मनोरंजन करायला सज्ज झाला आहे.

  • इथे दिसतं तसंच असतं! 'बिग बॉसचा' पहिला सीझन १५ एप्रिलपासून
SHARE

ज्या कार्यक्रमाची इतके दिवस नुसती चर्चा होती... ज्या कार्यक्रमाच्या घोषणेने मराठी प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला असा 'बिग बॉस मराठी' रिअॅलिटी शो १५ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस मराठी'ची घोषणा झाल्यापासूनच 'बिग बॉस'च्या घरात कोण कोण कलाकार असणार? आणि मुख्य म्हणजे 'बिग बाॅस'चा सूत्रसंचालक कोण असणार? याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इथे दिसतं तसंच असतं! असं म्हणत 'बिग बॉस'चा पहिला सीझन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे.
मांजरेकरांचं हटके 'होस्टींग'

मराठीच नाही, तर हिंदीतही दिग्दर्शन आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे महेश मांजरेकर 'बिग बाॅस'च्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

'हे' कलाकार बिग बॉसच्या घरात ?

'बिग बॉस'च्या घरात १५ कलाकार कॅमेऱ्याच्या नजरकैदेत असणार आहेत. अभिनेत्री उषा नाडकर्णी, नृत्यांगना मेघा घाडे, सुशांत शेलार, पुष्कर जोग, राजेश शृंगारपुरे, विकास पाटील, रेशम टिपणीस यांची 'बिग बॉस'च्या घरात वर्णी लागायची शक्यता आहे.


'बिग बॉस' हा आपल्या भारतीय टेलिव्हीजन क्षेत्रातील नावाजलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत असल्याने मी आनंदी आहे. या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी तयारी करणं अशक्य आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम कुठल्याही संहितेवर आधारित नाही. त्यामुळे या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणा खूप महत्त्वाचा ठरतो.
- महेश मांजरेकर, सूत्रसंचालक


मराठी 'बिग बॉस'ची खासियत म्हणजे स्पर्धक निवडताना वयाचं बंधन नाही. रिअॅलिटी शोमध्ये 'बिग बॉस'ची स्वत: ची अशी ओळख आहे. कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना लक्षात आलं की, मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून त्यांची आवड बदलत आहे. म्हणूनच आमच्या “नॉन फिक्शन” कार्यक्रमांचा साचा आम्ही बदलण्याचा विचार केला, अशी माहिती कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखील साने यांनी दिली.
हेही वाचा

कसं असेल मराठी बिग बॉस? इथे पाहा फर्स्ट लूक!

संबंधित विषय
ताज्या बातम्या