Advertisement

मराठी 'बिग बाॅस'ची सूत्रं महेश मांजरेकर यांच्या हाती

केवळ मराठीच नव्हे, तर हिंदीत कौशल्यपूर्ण दिग्दर्शन आणि अभिनयाने वेगळी छाप पाडणारे कलाकार महेश मांजरेकर यांच्या हाती बिग बाॅसची सूत्रं असणार आहेत. लवकरच काही विशेष प्रोमोमधून मांजरेकरांची ही नवी भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

मराठी 'बिग बाॅस'ची सूत्रं महेश मांजरेकर यांच्या हाती
SHARES

मराठी 'बिग बाॅस' या रिअॅलिटी शोची घोषणा झाल्यापासून बिग बॉसच्या घरात कोण कोण असणार? आणि मुख्य म्हणजे या शोचा सूत्रधार कोण असणार? या बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हे गुपीत आता उलगडलं असून केवळ मराठीच नव्हे, तर हिंदीत कौशल्यपूर्ण दिग्दर्शन आणि अभिनयाने वेगळी छाप पाडणारे कलाकार महेश मांजरेकर यांच्या हाती बिग बाॅसची सूत्रं असणार आहेत. लवकरच काही विशेष प्रोमोमधून मांजरेकरांची ही नवी भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


कधीपासून होताेय सुरू?

ज्या कार्यक्रमाची फक्त देशातच नाही, तर जगभरात चर्चा असते, ज्याचं प्रत्येक पर्व प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारं ठरतं, ज्या कार्यक्रमाने हिंदीतच नाही, तर प्रादेशिक भाषांमध्येही आपली हुकूमत कायम ठेवली असा रिअॅलिटी शोच्या दुनियेतील सर्वात उत्कंठावर्धक कार्यक्रम 'बिग बॉस' १५ एप्रिलपासून मराठीत सुरू होत आहे. कलर्स मराठीवर बिग बॉसचं हे मराठमोळं रुप बघायला मिळणार आहे. 'बिग बाॅस' मराठीत येणार यासंदर्भातील वृत्त सर्वात पहिल्यांदा 'मुंबई लाइव्ह'ने दिलं होतं.


प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

''बिग बॉस चाहते है!'' हे वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचंही लक्ष त्या आवाजाच्या दिशेनं वळतं आणि आता काय घडणार याची उत्सुकता लागते. हे सर्व प्रेक्षकांना आता मायबोली मराठीत बघायला मिळणार आहे. 'बिग बॉस' नेमक्या काय सूचना देईल? त्याची मराठी कुठली खास वाक्य असतील? त्याचा आवाज कसा? असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात आतापासूनच प्रश्न तयार झाले आहेत.


सच्च मित्र अन् गाॅडफादर

या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रधार. या सदस्यांना कधी प्रेमाने समजावणं, तर कधी धाक निर्माण करण्याचं काम शनिवार रविवारच्या भागात सूत्रधार करत असतो. ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत. मांजरेकर अनेकांसाठी सच्चे मित्र आहेत, तर काहींसाठी गुरु अन् काहींसाठी गॉडफादर आहेत. त्यामुळे कला क्षेत्रात त्यांच्याबद्दल जेवढं प्रेम आहे, तेवढाच आदरही आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू प्रेक्षकांना 'बिग बॉस'मधून अनुभवायला मिळतील.


कोण कलाकार असणार?

येत्या १५ एप्रिलपासून 'बिग बॉस'चं हे मराठमोळं रुप प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या घरात किती सदस्य असतील? कोण कोण असतील? त्यांच्यामध्ये काय काय घडेल? या प्रश्नांची उत्तरंही लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.



हेही वाचा-

कसं असेल मराठी बिग बॉस? इथे पाहा फर्स्ट लूक!

ठरलं...२ महिन्यांत 'बिग बॉस' मराठी येणार!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा