Advertisement

ठरलं...२ महिन्यांत 'बिग बॉस' मराठी येणार!

शिल्पाच्या विजेतेपदासोबतच आणखी एक घोषणा सलमान खानने केली. आणि या घोषणेमुळे बिग बॉस बघणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारी ही घोषणा होती 'बिग बॉस मराठी'ची!

ठरलं...२ महिन्यांत 'बिग बॉस' मराठी येणार!
SHARES

भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये यशाचा नवा ट्रेंड सेट करणाऱ्या बिग बॉसचं ११वं पर्व रविवारी संपलं. हिंदी एंटरटेन्मेंट वाहिन्यांमध्ये 'भाभीजी घर पे है' मालिकेमुळे एकाच वेळी लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेली शिल्पा शिंदे बिग बॉस सीजन ११ची विजेती ठरली.


...आणि 'बिग बॉस मराठी'ची घोषणा झाली!

बिग बॉस अर्थात अभिनेता सलमान खानने शिल्पा शिंदेच्या नावाची घोषणा करताच स्टुडिओसोबतच बाहेरही शिल्पाच्या चाहत्यांनी जल्लोष केला. मात्र, यावेळी शिल्पाच्या विजेतेपदासोबतच आणखी एक घोषणा सलमान खानने केली. आणि या घोषणेमुळे बिग बॉस बघणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारी ही घोषणा होती 'बिग बॉस मराठी'ची!

'मुंबई लाइव्ह'ने दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या वृत्तालाच सलमान खानने जणूकाही दुजोरा दिला होता. शिल्पा शिंदेच्या नावाच्या घोषणेसोबतच 'बिग बॉस' आता मराठीमध्येही सुरु होणार असल्याची घोषणा सलमान खानने केली. दोनच दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीसंदर्भात वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने दिलं होतं.


दोन महिन्यांत सुरु होणार 'बिग बॉस मराठी'!

मराठी प्रेक्षकांमध्ये 'बिग बॉस'च्या याआधीच्या सीजनला मिळालेली लोकप्रियता पाहून या शोची निर्माता कंपनी असलेल्या 'एण्डेमॉल शाईन इंडिया'ने मराठी बिग बॉस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच बिग बॉसचा पहिला मराठी सीजन सुरु होणार आहे. 'एण्डेमॉल शाईन इंडिया'तील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन महिन्यांमध्ये हा मराठी सीजन सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील बिग बॉसचं घरही तयार करण्यात आलं आहे.


रितेश देशमुख असणार 'बिग बॉस'!

यासंदर्भात कलर्स टीव्हीवरच घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीही कलर्स मराठीवरच प्रक्षेपित होणार आहे. यासोबतच 'मुंबई लाइव्ह'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलिवुड अभिनेता आणि अस्सल 'मराठी माणूस' रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'मध्ये होस्टची भूमिका साकारणार आहे. जी भूमिका हिंदी बिग बॉसमध्ये अभिनेता सलमान खान निभावतो.


कोण असणार सेलिब्रिटी?

'बिग बॉस मराठी'मध्ये अनेक मराठी सेलिब्रिटी असण्याची शक्यता आहे. मात्र, हे सेलिब्रिटी कोण असतील? याविषयी मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. येत्या दोन महिन्यांमध्ये 'बिग बॉस मराठी' सुरु होणार असल्यामुळे लवकरच या सेलिब्रिटींचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा