SHARE

बिग बॉस ११ सिझनच्या विनरची प्रतिक्षा अखेर संपली आहे. शिल्पा शिंदे हिने यंदाच्या फिनालेत बाजी मारत विजेतेपदावर कब्जा केला. तर हिना खान आणि विकास गुप्ता अनुक्रमे बिग बाॅस ११ चे उपविजेते ठरले.

भांडणं, गॉसिप्स, अफेअर्स यामुळे बिग बाॅस सिझन ११ ने स्वत:चा प्रेक्षकवर्ग तयार केला. केवळ तरूणांमध्ये नाही, तर समस्त प्रेक्षकांमध्ये बिग बॉसची क्रेझ वाढत गेली. बिग बॉस सिझन ११ मध्ये नेमका कोणता सेलिब्रिटी बाजी मारणार याची प्रेक्षकांमधील उत्सुकता टिपेला पोहोचली होती. अखेर शिल्पा शिंदे हिने सर्वांना मागे सोडत विजेपदावर नाव कोरलं.


हिना खानचा प्रभाव ओसरला

टीव्ही शोची राणी हिना खानने बिग बाॅस सिझन ११ च्या सुरुवातीला चाहत्यांवर आपल्या प्रामाणिकपणाच्या जोरावर मोहिनी घातली. मात्र हिनाचा प्रभाव चाहत्यांवर फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच तिच्या वागण्यामुळे टिकेला सामोरं जावं लागलं.


वागण्यातला बदल प्रेक्षकांना भावला

तर, दुसरीकडे शिल्पा शिंदेने बिग बाॅसमधील सुरुवात विकास गुप्ताबरोबर भांडणाने केली. याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे शिल्पा शिंदेचा भूतकाळ. शिल्पा शिंदेने 'भाभीजी घर पे है' या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारली होती. मात्र तिला या मालिकेतून कशाप्रकारे काढण्यात आलं हे प्रेक्षकांना माहितच आहे. त्यामुळे शिल्पाने विकास बरोबर केलेलं भांडण प्रेक्षकांसाठी नवीन नव्हतं. मात्र जसजसा शो पुढे गेला तसतशी या अंगुरी भाभीने आपल्या वागण्यात बदल केला. तीने सुरुवातीला किचनचा ताबा मिळवला. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची ती ला़डकी आई झाली. याचाच फायदा शिल्पा शिंदेला बिग बाॅस सिझन ११ जिंकताना झाला.

बिग बॉसच्या ११ विजेत्यांना ५० लाखांचं रोख पारितोषिक देण्यात आलं. एवढंच नाही, तर लवकरच हे सर्व सेलिब्रिटी आपल्याला कलर्स टीव्हीवर बघायला मिळतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या