महेश मांजरेकर करणार मराठी बिग बॉस होस्ट?

मनोरंजनचा बॉस अर्थात बिग बॉस मराठीमध्ये सुरू होतोय.त्यामुळे आता मराठी बिग बॉसचं होस्टींग कोण करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. मात्र सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे.

  • महेश मांजरेकर करणार मराठी बिग बॉस होस्ट?
  • महेश मांजरेकर करणार मराठी बिग बॉस होस्ट?
  • महेश मांजरेकर करणार मराठी बिग बॉस होस्ट?
SHARE

मनोरंजनचा बॉस अर्थात बिग बॉस मराठीमध्ये सुरू होतोय. मनोरंजनाचा तो तिसरा डोळा आता मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. बिग बॉसमधील सेलेब्रिटिंची ती लुटूपुटूची भांडणं, वाद, कारस्थानं बघायला सगळ्यांनाच आवडतात.


मांजरेकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार?

मात्र, बिग बॉसचा टीआरपी वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे बिग बॉसचा होस्ट सलमान खान. गेले ११ सीझन सलमान बिग बॉस होस्ट करतोय. त्यामुळे आता मराठी बिग बॉसचं होस्टींग कोण करणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. अभिनेता रितेश देशमुखनंतर आता बिग बॉस होस्टसाठी एका नावाची जोरदार चर्चा आहे. ते नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर!


नुकतचं बिग बॉस ११ चं पर्व संपलं. या पर्वात शिल्पा शिंदे या मराठमोळ्या मुलीने बाजी मारली. या महाअंतिमफेरीच्याच दिवशी सलमानने मराठी बिग बॉसची घोषणा केली आणि मराठी प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यांनतर मराठी बिग बॉसमध्ये कोण असणार? यावर चर्चा सुरू झाल्या. नुकताच कलर्स मराठीवरील मराठी बिग बॉसचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला. 

 


कोण असणार होस्ट?

मराठी बिग बॉसची घोषणा झाल्यानंतर होस्ट कोण करणार? या चर्चेला उधाण आलं. या चर्चेतून प्रामुख्याने तिन नावं पुढे आली.. ती म्हणजे अभिनेता रितेश देशमुख, श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर. सुरूवातीला रितेश देशमुख मराठी बिग बॉस होस्ट करणार असल्यच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र आता महेश मांजरेकरांचं नावं पुढे आलं आहे. त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे मराठी बिग बॉसचं पहिलं पर्व महेश मांजरेकर होस्ट करताना दिसण्याची दाट शक्यता आहे. कोण असणार सेलेब्रिटी?

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अनेक नामवंत सेलेब्रिटी असण्याची शक्यता आहे. मात्र हे कोण सेलेब्रेटी आहेत? याबबात माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच याबबात घोषणा करण्यात येईल.


हेही वाचा -

एंटरटेन्मेंटचा 'बिग बॉस' आता मराठीत!

संबंधित विषय
ताज्या बातम्या