Advertisement

प्रभास आणि अनुष्कामध्ये चाललंय काय?


प्रभास आणि अनुष्कामध्ये चाललंय काय?
SHARES

बातमीचं मुख्य शीर्षक अर्थात हेडर वाचून तुम्ही म्हणाल की कुठे बाहुबली फेम प्रभास आणि कुठे विराट फेम अनुष्का! पण ही अनुष्का म्हणजे बॉलिवुडची अनुष्का शर्मा नसून टॉलिवुडची अनुष्का शेट्टी आहे. आणि हा प्रश्न उठण्याचं कारण म्हणजे प्रभास आणि अनुष्का या दोघांनी केलेले बॅक टू बॅक सिनेमे! तामिळ भाषेत तर या दोघांनी अनेक सिनेमे सोबत केले आहेत. मात्र बाहुबलीच्या दोन्ही भागांमध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केल्यामुळे वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत.



बाहुबली सिनेमाच्या निमित्ताने सुरु झालेल्या चर्चांपैकी सर्वात खमंग चर्चा म्हणजे 'प्रभास और अनुष्का के बीच में कुछ है क्या?' आणि याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर नवभारत टाईम्स या दैनिकाने प्रभासला प्रश्न विचारला. आणि त्यावर कोणतेही आढेवेढे न घेता प्रभासने खरं काय ते सांगून टाकलं!



प्रभास म्हणतो, 'आमच्यात नक्कीच नातं आहे आणि हे कुणालाही कळू नये असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. आमच्या दोघांच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यात मित्रत्वाचं नातं आहे. पण चर्चा करणाऱ्यांची ही सवयच असते, की एखादा हिरो आणि हिरोईनने सोबत काही चित्रपट केले की त्यांच्यात काहीतरी आहे अशा वावड्या उठवायच्या. पण आमच्यात नातेसंबंध असले, तरी 'तसं' काहीच नाही', असा खुलासा प्रभासने यावर केला आहे.

प्रभासने हा खुलासा केला असला, तरी चर्चा करणाऱ्यांचं मात्र यातून समाधान होईल की नाही ही शंकाच आहे! त्यामुळे पुढचे काही दिवस तरी प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या 'चर्चित' नात्याची खुमासदार चर्चा आपल्याला ऐकायला मिळणार यात शंका नाही!



हेही वाचा

कंगनाची बहीण ऋतिकला म्हणते 'अंकल'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा