SHARE

माटुंगा - 'राजहंस प्रकाशन'च्या वसंत लिमये यांच्या 'विश्र्वस्त' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे झाला. वसंत लिमये यांनी लॉक ग्रिफिननंतर आपल्या विश्र्वस्त सारखी भन्नाट, रहस्यमय कथानक आणि उत्कंठावर्धक कादंबरी रसिकांसाठी आणली आहे. अमेरिकन थ्रिलर सारखा या कथानकाचे विविध सूत्र गुंफत एक वेगळाच थरार या स्वरूपात वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. तर, कादंबरी वाचताना यात असणारी प्रत्येक व्यक्तीरेखा ही आपल्या संबंधित आणि तेवढीच जवळची वाटेल असे वसंत लिमये यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या