अमिताभ बच्चन म्हणजे वाईन - रामगोपाल वर्मा


  • अमिताभ बच्चन म्हणजे वाईन - रामगोपाल वर्मा
  • अमिताभ बच्चन म्हणजे वाईन - रामगोपाल वर्मा
  • अमिताभ बच्चन म्हणजे वाईन - रामगोपाल वर्मा
SHARE

'ये आदमी तब तक नही हारेगा, जब तक जनता उसकी तरफ है'. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या सरकार ३ चित्रपटाच्या ट्रेलर सुरुवात याच डायलॉग्सनी होते आणि चित्रपटाचा शेवट होतो तो, 'मुझे जो सही लगता है, मैं करता हूं, वह चाहे भगवान के खिलाफ हो, समाज के खिलाफ, पुलिस, कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों ना हो' या अमिताभ यांच्या दमदार आवाजातील डायलॉग्सनं. चित्रपटात दाखवण्यात आलेले सुभाष नागरे यांचे विचार रीयल लाईफमध्ये रामगोपाल वर्मा यांच्याशी मिळते जुळते आहेत. जसे आहोत तसेच राहणे रामगोपाल वर्मा यांना पसंत आहे. गुड मॉर्निंग आणि गुड नाईट बोलणारे रामगोपाल वर्मा यांना आवडत नाहीत. तर आतापर्यंत स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांवर त्यांनी असमाधान व्यक्त केलं आहे. अशा अनेक मुद्द्यांवर रामगोपाल वर्मा यांनी आपले विचार मांडले आहेत.

अंडरवर्ल्ड कंसल्टेंसी

अंडरवर्ल्डच्या नावानं लोकं थरथर कापतात. पण रामगोपाल वर्मा यांनी मात्र अंडरवर्ल्ड या विषयावर बिनधास्त गप्पा मारल्या. जर मी दिग्दर्शक नसतो तर मी अंडरवर्ल्ड कंसल्टंसी सुरू केली असती आणि एडवायजर झालो असतो. अंडरवर्ल्डमधून कधी धमकी मिळाली आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, "मला कधी अंडरवर्ल्डमधून धमकी नाही मिळाली. कारण मी स्वत: दाऊद इब्राहिम आहे. मी प्लास्टिक सर्जरी केली आहे," असे त्यांनी हसत हसत सांगितलं. "मला दाऊद इब्राहिम आवडतो. खास करून त्याचं नाक मला खूप आवडतं," अशी कबूलीही रामगोपाल वर्मानं दिली.

वादग्रस्त ट्वीट्सना रामराम

रामगोपाल वर्मा यांचे ट्वीट म्हणजे बवालच... विषय कोणताही असो पण त्यावर त्यांनी ट्वीट केलं की वाद निर्माण झालाच पाहिजे. पण यापुढे वादग्रस्त ट्वीट लिहणार नाही असं आश्वासन रामगोपाल वर्मा यांनी दिलं आहे. "मी कधी कोणत्या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही. त्यामुळे मला वाटायचे की दुसरेही माझ्या ट्वीटला सिरियसली घेणार नाहीत. पण आता मला कळालं की मी किती चुकीचा विचार करत होतो ते. त्यामुळे मी वादग्रस्त ट्वीट करणार नाही."

माझे सर्वच चित्रपट बकवास

रामगोपाल वर्मा यांना त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एखाद दुसऱ्या चित्रपटाचा पश्चाताप झाला नाही तर सर्वच चित्रपटांचा झाला. त्यांचानुसार आणखी चांगले चित्रपट बनवू शकले असते. पण खूप बकवास चित्रपट बनवल्याची कबुलीही त्यांनी दिली. कंपनी तर खूपच बकवास चित्रपट होता.

मी दुसऱ्यांवर अन्याय करतो

तुमच्यासोबत कोणता अन्याय झाला आहे का या प्रश्नावर रामगोपाल वर्मा म्हणाले की, "माझ्यावर कुणी अन्याय नाही केला. उलट मी दुसऱ्यावर अन्याय केला आहे."

अमिताभ बच्चन म्हणजे वाईन

अमिताभ बच्चन आणि वाईन? याचा काय संबंधं? पण हे खुद्द रामगोपाल वर्मा यांनी म्हटलंय. अमिताभ बच्चन यांनी १२ वर्षांपूर्वी सरकार चित्रपट केला होता. त्यावेळेच्या सरकार आणि आताच्या सरकार ३ मध्ये काय फरक आहे? या प्रश्नावर रामगोपाल यांनी अमिताभ यांना वाईन म्हणून संबोधलं. अमिताभ हे वाईनसारखे आहेत. वाईन जेवढी जूनी तेवढी चांगली. त्यांचं वय वाढणं त्यांच्यासाठी चांगलं आहे.

आमिर खानला दिग्दर्शकाची गरज नाही

"रामगोपाल वर्मा यांच्यानुसार आमिर खानला कोणत्या दिग्दर्शकाची गरज नाही. आमिरचे जे विचार आहेत ते दिग्दर्शकाच्या वरचे आहेत. आमिर खानसारखे माझ्यात फोकस आणि पेश्नस नाही. त्यामुळे मला आमिर खानसोबत काम नाही करायचं."

संबंधित विषय
ताज्या बातम्या