संजयच्या बायोपिकमध्ये रणबीरचे डिफरन्ट लुक्स


SHARE

मुंबई - अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तवर आधारीत बायोपिकमध्ये काम करणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण चित्रपटात रणबीर कपूरचे चक्क सहा वेगवेगळे लुक्स पाहायला मिळणार आहेत. संजय दत्तच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हुबेहुब मांडता यावा यासाठी त्याने लुक्समध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

निर्माता राजकुमार हिराणी संजय दत्तच्या आयुष्यावर बायोपिक बनवत आहेत. संजय दत्तच्या फिल्मी करिअरपासून ते तुरूंगात जाईपर्यंतचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या प्रवासात संजय दत्तचा लुक वेगवेगळा होता. सुरुवातीला संजयचे केस थोडे मोठे होते. तर कधी चित्रपटासाठी मिशाही संजय दत्तने वाढवल्या होत्या. त्यामुळे संजय दत्तची भूमिका साकारणारा रणबीरही या सर्व लुक्समध्ये पहायला मिळणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

संजयच्या बायोपिकमध्ये रणबीरचे डिफरन्ट लुक्स
00:00
00:00