राणी ने शेअर केला 'आदिरा'चा पहिला फोटो

 Juhu
राणी ने शेअर केला 'आदिरा'चा पहिला फोटो
राणी ने शेअर केला 'आदिरा'चा पहिला फोटो
See all

मुंबई - हल्ली सोशल नेटवर्किंग साइटवर प्रत्येक जण आपल्या पर्सनल आयुष्यातील क्षण अपलोड करून शेअर करतोय. राणी मुखर्जीचाही या यादीत समावेश झालाय.

राणीची मुलगी आदिरा १ वर्षांची झाली आहे. 9 डिसेंबर 2015 रोजी आदिराचा जन्म झाला होता. त्याच निमित्तानं तिनं आज, 9 डिसेंबर रोजी मुलीसोबतचा फोटो आणि सोबत एक पत्रही शेअर केलंय. यशराजच्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आलाय.

या पात्रात राणी म्हणते की, ‘माझं आदिरावर खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. तिच्या जन्मानंतर माझं आयुष्य बदललं आहे. पण एका बाळाचं पालन-पोषण करणं अतिशय कठीण काम आहे. कारण तुम्ही स्वत:साठी जगणं विसरून जाता आणि तुमच्या बाळासाठी जगण्यास सुरुवात करता. बाळ तुम्हाला आईच्या रुपानं नवा जन्मच देतं. मी रात्री झोपू शकत नाही. दिवसाही मी झोपू शकत नाही. मी त्या सर्व मातांबद्दल विचार करते, ज्यांना मुलं आहेत. माझ्यासोबत जे होतंय ते त्यांच्यासोबतही होत असेल का? मी सर्व मातांना सलाम करते. आदिराचा माझ्या पोटी जन्मझाल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. मला माहिती नाही, आयुष्याच्या या टप्प्यात कोणी मला समजून घेऊ शकतं की नाही. पण मी माझं आयुष्य जगते आहे. कोणत्याही भीतीशिवाय, शिस्तीत आदिराला वाढवेन, अशी मला आशा आहे. सगळ्यांना तिचा अभिमान वाटावा, अशी माझी इच्छा आहे. मला तिचा कायम अभिमान असेल.”

Loading Comments