Advertisement

त्रास देणाऱ्याचा रणवीर घेणार क्लास


त्रास देणाऱ्याचा रणवीर घेणार क्लास
SHARES

अभिनेता रणवीर सिंहच्या चाहत्यांना जरी त्याच्या ‘गल्ली बॅाय’ या आगामी सिनेमाची उत्सुकता असला तरी त्यानं मात्र रोहित शेट्टी आणि करण जोहरसोबत एक नवीन क्लास सुरू केला आहे.


प्रमोशनचा नवीन फंडा

झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’ या सिनेमासोबतच रोहित शेट्टीसोबतच्या ‘सिम्बा’मुळंही रणवीर सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘सिम्बा’ प्रदर्शित व्हायला अद्याप खूप वेळ असला तरी रोहित आणि करणसोबत रणवीरनं या सिनेमाचं प्रमोशन करायला सुरुवातही केली आहे. २८ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सिम्बा’चा एक गंमतीशीर व्हिडीयो नुकताच रिलीज करण्यात आला. या व्हिडीओमध्ये रणवीर मराठीत सिनेमाचा डायलॅाग बोलताना दिसतो.


रणवीरचा नवीन क्लास

“मी स्टार पोलिस इन्स्पेक्टर संग्राम भालेराव, जो देतो त्रास त्याचा मी घेतो क्लास” हा डायलॅाग रणवीर बोलतो. इतक्यात रोहित त्याला थांबवण्यासाठी येतो. त्याच्या मागोमाग “हा ‘सिंघम ३’चा सेट आहे?”, असं मराठीत विचारत सारा अली खान येते. त्यावर साराकडे पाहून रोहित “आयला, अमृता सिंग...”, असं म्हणतो. त्यावर सारा दोघांच्या मागे धावत जाते आणि तिघेही पसार होतात. मग करण येऊन ‘सिम्बा’ची रिलीज डेट सांगतो.


‘सिंघम’ची झलक

हा व्हिडीयो ‘सिम्बा’ या सिनेमाची एक छोटीशी झलक दाखवणारा आहे. रोहितचा हा सिनेमा ‘सिंघम’ स्टाइलचाच असणार याची जाणीव हा व्हिडीओ पाहिल्यावर येते. यावेळी रोहितसोबत अजय देवगण नसून, रणवीर सिंग आहे. इतकंच नव्हे तर निर्मितीमध्ये करण जोहर आहे. त्यामुळे ‘सिम्बा’च्या रूपात एक वेगळंच रसायन पाहायला मिळणार अशी अपेक्षा करायला हरकत नाही.हेही वाचा -

Exclusive: हिरानींच्या ‘संजू’मधील मराठमोळा आवाज

मोलोडिस्ट किव’ महोत्सवामध्ये ‘हाफ तिकीट’चा डंका


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा