Advertisement

Exclusive: हिरानींच्या ‘संजू’मधील मराठमोळा आवाज

‘संजू’मधील आपलं काम छोटं असलं तरी राजकुमार हिरानींसारख्या एका मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव पुढील वाटचालीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं ‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचीत करताना गणेश म्हणाला.

Exclusive: हिरानींच्या ‘संजू’मधील मराठमोळा आवाज
SHARES

सध्या सिनेइंडस्ट्रीत अभिनेता संजय दत्तवर आधारित असलेल्या राजकुमार हिरानींच्या ‘संजू’ सिनेमाची चर्चा आहे. यात रणबीर कपूरने साकारलेल्या संजूबाबाचं चांगलंच कौतुक होत आहे. या सिनेमात गणेश दिवेकर या मराठी डबिंग आर्टिस्टचाही खारीचा वाटा आहे.


पडद्यामागचा कलाकार

बरेच मराठमोळे चेहरे हिंदी सिनेसृष्टीत पडद्यामागे राहून काम करत असतात, पण प्रकाशझोतात येत नाहीत. गणेश दिवेकर असाच एक आर्टिस्ट आहे. गणेशचा चेहरा हिंदी सिनेमांमध्ये फार दिसला नसला तरी आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या ‘संजू’ सिनेमातही गणेशचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ‘संजू’मधील आपलं काम छोटं असलं तरी राजकुमार हिरानींसारख्या एका मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव पुढील वाटचालीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं ‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचीत करताना गणेश म्हणाला.


डबिंग क्षेत्रातील नामवंत कलाकार...

गणेश केवळ डबिंग आर्टिस्ट नसून अभिनेताही आहे. मराठी सिनेमांसोबतच त्याने काही हिंदी सिनेमांमध्येही लहानसहान भूमिका साकारल्या आहेत. विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘भावेश जोशी’ या सिनेमासोबतच प्रदीप सरकार यांच्या ‘लफंगे परींदे’मध्येही गणेशने लहानसा रोल केला आहे.


'यांच्या'साठी करतो डबिंग

अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार, परेश रावल, शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, अजय देवगण या अभिनेत्यांपासून महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा या क्रिकेटर्ससाठी गणेशच डबिंग करतो.कालातही आवाज

‘जोधा अकबर’मध्ये बिरबल, ‘बाहुबली २’मध्ये कृष्णा वर्मा यांसारख्या बऱ्याच हिंदी सिनेमांसोबतच गणेशने ‘द हिटमॅन्स बॅाडीगार्ड’, ‘थॅार’, ‘गेम आॅफ थ्रोन्स’सारख्या बऱ्याच हॅालिवूडपटांसाठीही डबिंगचं काम केलं आहे. येत्या शुकवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘काला’मध्ये रजनीकांत यांच्या मोठ्या मुलाच्या रोलमधील दिलीपनसाठीही गणेशने डबिंग केलं आहे.


‘संजू’साठी बनला भाई...

‘संजू’मधील भाईच्या एका महत्त्वाच्या फोन कटसाठी हिरानींना एक आवाज हवा होता. त्यासाठी दोन-तीन डबिंग आर्टिस्टने डब केलं, पण हिरानींच्या ते पसंत पडलं नाही. त्यामुळे ते एका चांगल्या डबिंग आर्टिस्टच्या शोधात होते. ‘संजू’चे साऊंड डिझायनर विश्वजीत चॅटर्जी यांनी हिरानींना गणेशचं नाव सुचवलं. चॅटर्जींचा गणेशला फोन आला. त्यांनी ‘संजू’साठी डबिंग करण्याबाबत विचारलं. गणेशने तात्काळ होकार दिला आणि त्याच्यासाठी ‘संजू’ सिनेमाचं दार उघडलं गेलं.


हिरानींच्या कार्यपद्धतीला सलाम...

हिरानींची काम करण्याची पद्धत खूप वेगळी असून कोणत्याही सिनेमाचं काम ते आत्मीयतेने करतात याची जाणिव गणेशला ‘संजू’च्या निमित्ताने झाली. गणेश म्हणाला की, ''राजूसरांच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला. माझा आवाज राजूसरांना खूप आवडल्याने डबिंगच्या वेळी ते स्वत: हजर होते. त्यावेळी रणबीर कपूरचंही डबिंग सुरू होतं. डबिंग सुरू होण्यापूर्वीच माझ्या हाती पेमेंटचा चेक आला. माझं डबिंग सुरू असताना राजूसरांचं जेवण आलं, पण त्यांनी माझं डबिंग पूर्ण झाल्यावर जेवण करूया असं म्हटलं. ही गोष्ट सायंकाळी साडे चारची. माझं डबिंग पूर्ण झाल्यानंतर ५ वाजता त्यांनी दुपारचं जेवण केलं. “अभी तो पत्थर फेका है...” अशा आशयाचा डायलॅाग मी डब करत होतो. त्या छोट्याशा फोन कटसाठीही ते जेवण करायचे थांबले यातून त्यांची सिनेमाबाबतची आत्मीयता जाणवली.''


हेमू अधिकारींची आठवण...

हिरानींच्या पहिल्या सिनेमात दिवंगत अभिनेते हेमू अधिकारी होते. आज ते हयात नसले तरी हिरानींच्या मनात त्यांच्याबाबतच्या आठवणी ताज्या आहेत. हिरानींच्या म्हणण्यानुसार, हेमू अधिकारी खूप उत्तम कलाकार होते. आज ते असते तर आपल्या आगामी सिनेमातही नक्कीच दिसले असते. मराठी कलाकार स्टेजवर काम केलेले असल्याने छोट्याशा सीनमध्येही जीव ओततात. यासाठी त्यांना वेगळ्या रिहर्सलची गरज लागत नसल्याचं हिरानी मानतात.हेही वाचा-

Exclusive: सुबोधच्या आठवणींचं ‘पुष्पक विमान’

'फर्जंद'ला प्राइम टाइम शो मिळेना! मनसे उतरणार रस्त्यावरसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा