Advertisement

'फर्जंद'ला प्राइम टाइम शो मिळेना! मनसे उतरणार रस्त्यावर

फर्जंद चित्रपटाला देखील प्राइम टाइम शो देण्यास थिएटर मालकांनी नकार दिला आहे. यावरून थिएटर मालक आणि निर्मात्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला असून या वादाने आता राजकीय वळण घेतलं आहे. कारण फर्जंदला येत्या २ दिवसांत प्राइम टाइम शो न मिळल्यास मनसे आपल्या स्टाइलने मालकांना धडा शिकवेल, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बुधवारी दिला आहे.

'फर्जंद'ला प्राइम टाइम शो मिळेना! मनसे उतरणार रस्त्यावर
SHARES

मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये 'प्राइम टाइम शो' न मिळण्याचा सिलसिला सुरूच असल्याचं दिसत आहे. सध्या ज्या मराठी एेतिहासिक चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे, त्या फर्जंद चित्रपटाला देखील प्राइम टाइम शो देण्यास थिएटर मालकांनी नकार दिला आहे. यावरून थिएटर मालक आणि निर्मात्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला असून या वादाने आता राजकीय वळण घेतलं आहे. कारण फर्जंदला येत्या २ दिवसांत प्राइम टाइम शो न मिळल्यास मनसे आपल्या स्टाइलने मालकांना धडा शिकवेल, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बुधवारी दिला आहे.सर्व शो दुपारचे

फर्जंद सिनेमा १ जूनला प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण मुंबईत फर्जंदचे जे ११२ शो होत आहेत ते सर्व दुपारचे आहेत. त्यामुळं मुंबईतील नोकरदार-चाकरमानी प्रेक्षकांना चित्रपट बघण्याची इच्छा असूनही रात्री थिएटरला जाऊन चित्रपट बघता येत नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे येत असल्याची माहिती फर्जंदचे निर्माते संदीप जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.मनसेचं आश्वासन

फर्जंदला प्राइम टाइम शो मिळावा, अशी मागणी आम्ही थिएटर मालकांकडे केली आहे. पण थिएटर मालक मात्र प्राइम टाइम शो देण्यास स्पष्ट नकार देत असल्याचंही जाधव यांनी सांगितलं. या प्रकाराची माहिती कळताच खोपकर यांनी आपल्याशी संपर्क साधून फर्जंदसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं आश्वासन दिल्याचंही जाधवांनी सांगितलं.तर, खळ्ळ खट्याक

फर्जंदच्या निर्मात्यांच्या मागणीनुसार प्राइम टाइम शो द्या असं पत्र त्वरीत आम्ही थिएटर मालकांना पाठवणार आहोत. त्यानुसार मालकांना २ दिवसांचा अल्टीमेट देण्यात येईल. २ दिवसांत फर्जंदला प्राइम टाइम शो मिळाले नाही, तर मग मनसे रस्त्यावर उतरून मुंबईभर मनसे स्टाईल आंदोलन करेल, अशी माहिती खोपकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. त्यामुळे मनसेच्या या इशाऱ्यानंतर तरी मालक नरमतात का की मनसेकडून खळखट्याक होतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा-

Exclusive: सुबोधच्या आठवणींचं ‘पुष्पक विमान’

सिनेमागृहात वाजणार मशिदीवरील ‘भोंगा’?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा