Advertisement

Exclusive: सुबोधच्या आठवणींचं ‘पुष्पक विमान’

सिनेमाचं लेखन करणं ही सुबोधसाठी तशी नवीन गोष्ट नाही. यापूर्वी त्याने अभिनेता स्वप्निल जोशीच्या साथीने ‘फुगे’ या मराठी सिनेमाचं लेखन केलं आहे. पण प्रथमच त्याने स्वतंत्रपणे ‘पुष्पक विमान’ या मराठी सिनेमाची कथा लिहीली आहे. या सिनेमाचं बरचसं काम पूर्ण झाल्याने ‘पुष्पक विमान’च्या टेकआॅफचे म्हणजेच प्रदर्शनाचे वेध लागल्याचं सुबोधने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.

Exclusive: सुबोधच्या आठवणींचं ‘पुष्पक विमान’
SHARES

चतुरस्र अभिनेता अशी स्वत: ची ओळख निर्माण करणाऱ्या सुबोध भावेने अभिनयासोबतच दिग्दर्शनातही नावलौकीक मिळवला आहे. त्यातच आता स्वतंत्र लेखक आणि निर्माता म्हणूनही सुबोधची नवी दोन रूपं पाहायला मिळणार आहेत.

सिनेमाचं लेखन करणं ही सुबोधसाठी तशी नवीन गोष्ट नाही. यापूर्वी त्याने अभिनेता स्वप्निल जोशीच्या साथीने ‘फुगे’ या मराठी सिनेमाचं लेखन केलं आहे. पण प्रथमच त्याने स्वतंत्रपणे ‘पुष्पक विमान’ या मराठी सिनेमाची कथा लिहीली आहे. या सिनेमाचं बरचसं काम पूर्ण झाल्याने ‘पुष्पक विमान’च्या टेकआॅफचे म्हणजेच प्रदर्शनाचे वेध लागल्याचं सुबोधने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.


बालपणींच्या आठवणींची देणगी...

आपण लिहिलेला ‘पुष्पक विमान’ हा सिनेमा म्हणजे बालपणींच्या गोड आठवणींचा खजिना असल्याचं सुबोधने सांगितलं. सुबोध पुढं म्हणाला, ''या सिनेमात मी एका अशा नात्याची गोष्ट मांडली आहे, जे आनंददायी असेल... इमोशनल असेल, पण दु:खी नसेल. या सिनेमाची कथा आजी-आजोबांसोबतच्या नात्यावर आधारीत आहे. हे नातं खूप जवळचं असतं. आजी-आजोबा आणि नातवंडांचं नातं हे दु:ख देणारं नसून, अपार आनंद देणारं असतं. आयुष्यभराची मैत्री देणारं असतं. माझं माझ्या आजोबांसोबत खूप स्पेशल नातं होतं. या नात्यावरूच ‘पुष्पक विमान’ची कथा सुचली.''



निर्मात्याचा रोलही निभावला...

मागच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात सुबोधला ‘पुष्पक विमान’ची कथा सुचली. त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पटकथेवर काम पूर्ण झालं. त्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आणि ‘पुष्पक विमान’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेत सुबोधने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. मंजिरी भावे, सुनिल फडतरे आणि अरुण जोशी यांच्या साथीने सुबोधने कान्हाज मॅजिक या बॅनरखाली ‘पुष्पकविमान’ची निर्मिती केली आहे.


सुबोधच्या संकल्पनेतील शीर्षक...

‘पुष्पक विमान’ हे शीर्षक सुबोधच्याच कल्पनेतून आकाराला आलं आहे. बालपणी विमान आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या बऱ्याच आठवणींनी प्रत्येकाच्या मनात घर केलेलं असतं. या सिनेमातही त्याच आठवणींची गोष्ट असल्याने त्याला अनुसरून ‘पुष्पक विमान’ हे शीर्षक ठेवण्यात आलं आहे. वैभव चिंचाळकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘पुष्पक विमान’मध्ये सुबोधसोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत आहेत. याखेरीज इतर बरेच कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत. मुंबईसह जळगाव, भुसावळ आणि औरंगाबाद येथे या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. डबिंग पूर्ण झालं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्याचा सुबोध आणि त्याच्या टिमचा मानस आहे.



हेही वाचा-

प्रेक्षकांना 'मस्का' लावण्याचा चांगला प्रयत्न

तृषार्त' ८ जूनला चित्रपटगृहात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा