Advertisement

'तृषार्त' ८ जूनला चित्रपटगृहात


'तृषार्त' ८ जूनला चित्रपटगृहात
SHARES

नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. कोणतंही नातं टिकवण्यासाठी किंवा ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. आजच्या काळात मात्र नातेसंबंधात दुरावा येत चालला आहे. बदलती सामाजिक परिस्थिती, भौतिक गरजा यामधून विसंवाद निर्माण होतो. तोच कारणीभूत ठरतो नात्यांमधील विद्रोहाला. हाच विसंवाद केंद्रस्थानी असलेला ‘तृषार्त’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘यशोभूमी एन्टरटेन्मेंटस’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सविता मोरे तर दिग्दर्शन अरुण मावनूर यांनी केलं आहे.


चित्रपटाची कथा

तृषार्त या चित्रपटाची कथा कृष्णा आणि भाऊराव या दाम्प्त्याच्या आयुष्यावरबेतली आहे. काही जण नातेसंबंधांपासून पळ काढून आपलं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कृष्णा आणि भाऊराव यांच्या मुलांनीही स्वत:चं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. पती-पत्नीच्या नात्यातील वीण आणि मुलांच्या नात्यातील भावनिक द्वंद्व याचं चित्रण या चित्रपटात केलं गेलं आहे. कालानुरूप बदलत गेलेली नात्यांची समीकरणं या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.


चित्रपटात या कलाकारांच्या भूमिका

या चित्रपटात ज्योती निवडुंगे, महेश सिंग राजपूत, अमूल भुटे, दिलीप पोतनीस, वृंदा बाळ, डॉ. जाधव, निलांगी रेवणकर, योगिता चौधरी, अक्षय वर्तक, निशांत पाथरे, विनया डोंगरे, मिलीषा जाधव, भूमी मोरे,लवेश शिंदे, चंद्रकांत मिठबावकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा