Advertisement

काय आहे 'संजू'च्या टीझरमध्ये? बघा


काय आहे 'संजू'च्या टीझरमध्ये? बघा
SHARES

संजय दत्तवर आधारीत संजू या बायोपिकचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. संजू या चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. या चित्रपटातून संजूबाबाच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे प्रेक्षकांसमोर उलगडले जातील. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं आहे.


टीझरचाही खास अंदाज

चित्रपटाचं टीझर खास अंदाजात लाँच करण्यात आला आहे. १ मिनीट २६ सेकंदाच्या टीझरमध्ये रणबीरच्या जबरदस्त अभिनयाची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. हा टीझर ८०हून अधिक चॅनल्सवर प्रसारित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे हिंदी, इंग्लिश आणि प्रादेशिक भाषांमध्येही टीझर रिलीज करण्यात आला आहे.

 

अपना लाईफ फुल साप सिडी का बोर्ड है अशा मजेदार संवादने या टीझरची सुरूवात होते. या टीझरने प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण केली आहे. हा टीझर बघताना रणबीर संजय दत्तची भूमिका करताना कुठेही कमी पडलेला नाही. तो अगदी संजय दत्तसारखा चालतो आणि बालतो आणि हुबेहुब त्याच्यासारखाच दिसतोही. ये तो सिर्फ टीझर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अशी काहीशी अवस्था प्रेक्षकांची टीझर बघताना होते.


यात विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त यांचा गेस्ट अपियरेंस असणार आहे. चित्रपट २९ जून २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा