Advertisement

‘मोलोडिस्ट किव’ महोत्सवामध्ये ‘हाफ तिकीट’चा डंका


‘मोलोडिस्ट किव’ महोत्सवामध्ये ‘हाफ तिकीट’चा डंका
SHARES

आजवर बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवलेल्या बहुचर्चित ‘हाफ तिकीट’ या मराठी सिनेमाचा डंका ‘४७ व्या मोलोडिस्ट किव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्येही वाजला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘टीन स्क्रीन ज्युरी’ हा महत्त्वाचा पुरस्कार ‘हाफ तिकीट’ने पटकावला आहे.


दोन लहानग्यांची धडपड

जगण्याचा संघर्ष आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधणाऱ्या दोन लहानग्यांची धडपड ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून दिग्दर्शक समित कक्कडने दाखवली आहे.

युक्रेनमधील किव शहरामध्ये झालेल्या सोहळ्यात समितने हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी समितने प्रेक्षक तसेच तिथल्या चित्रपट जाणकारांशी संवाद साधत या चित्रपटामागील आपल्या भावनाही व्यक्त केल्या. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बालकलाकारांच्या अभिनयाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. याशिवाय ‘हाफ तिकिट’च्या यशस्वी दिग्दर्शनाबद्दल समितचं अभिनंदनही केलं.


यांच्या भूमिका महत्त्वाच्या

‘व्हिडिओ पॅलेस’च्या नानूभाई जयसिंघानिया यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘हाफ तिकीट’ या सिनेमाने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंच; त्यासोबतच देश-विदेशातील २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपला ठसा उमटवला आहे.

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा