Advertisement

मुंबई विद्यापीठात रंगणार 'नाटक'!


मुंबई विद्यापीठात रंगणार 'नाटक'!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडेमी आॅफ थिएटर आर्ट्स आणि नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १०वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ विद्यानगरीत रंगणार आहे. २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान रंगणाऱ्या नाट्योत्सवाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या नाट्योत्सवाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.


मोफत नाटकांची पर्वणी

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाट्योत्सवात सर्व नाटके मोफत दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे नाट्यप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने हा उत्सव म्हणजे मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.


विविध भाषांतील नाटकांचा समावेश

या नाट्योत्सवाची सुरुवात मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या ‘तमाशा’ या कार्यक्रमाने होईल. त्यानंतर दररोज सांताक्रूझ विद्यानगरीतील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन आणि मुक्ताकाश रंगमंच येथे रोज एक नाटक सादर केले जाईल. नाट्योत्सवात मराठी, बंगाली, भोजपुरी, हिंदी, बघेली, मणिपुरी अशा विविध भाषांमधील नाटकांचा समावेश असेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा