Advertisement

'अजब सिंग कि गजब कहानी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


SHARES

अंधेरी - 'अजब सिंग कि गजब कहानी' या हिंदी सिनेमाचा फर्स्ट लुक आणि ध्वनीफित प्रकाशन सोहळा दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हार्ड रॉक कॅफे वीरदेसाई अंधेरी पश्चिम या ठिकाणी पार पडला.
अजय सिंह हे आता सध्या रांची येथे आयकर उपायुक्त म्हणून कार्यरत असून ते पहिल्या १० आयकर अधिकाऱ्यांमध्ये मानले जातात. त्यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. त्यांनी जिद्दीने, चिकाटीने ध्येयाने आणि कष्टाने संघर्ष करून आपले करिअर कसं घडवले आणि एक यशस्वी व्यक्तिमत्व घडवले. विशेष म्हणजे या जीवनपटात अजय सिंह यांची व्यक्तिरेखा चक्क अजय सिंग यांनीच साकारली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एखादा रिअल लाईफ हिरो प्रथमच आपली भूमिका पडद्यावर साकारताना दिसणार आहे. या आगळ्यावेगळ्या जीवनपटाची कथा आणि दिग्दर्शक ऋषी मिश्र यांनी केले असून हा सिनेमा १६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अजय सिंग अपंगत्व असूनही आपल्या कर्तबगारीमुळे देशासाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व ठरले आहेत. अशा व्यक्तीचा जीवनपट प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement