रेखा सबनीस यांचं निधन

 Charni Road
रेखा सबनीस यांचं निधन

ऑपेरा हाऊस - रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार रेखा सबनीस यांचे कर्करोगाच्या आजाराने सोमवारी पहाटे मुंबईतील ऑपेरा हाऊसजवळील इंदिरा निवासस्थानी निधन झाले. त्या ७४ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. रेखा सबनीस यांची संस्कृत, मराठी आणि हिंदी या तीनही भाषांवर पकड होती. प्रायोगिक नाटकांमध्येच रमलेल्या रेखा सबनीस यांनी चित्रपटांतून काम करतानाही समांतर चित्रपटांचीच निवड केली. ‘भूमिका’, ‘पार्टी’, ‘२७ डाऊन’, ‘द स्क्वेअर सर्कल’ अशा चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. त्यांनी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणूनही चित्रपटांचे काम पाहिले होते. 

Loading Comments