Advertisement

हेमंत ब्रीजवासी ठरला 'राइजिंग स्टार 2' चा विनर


हेमंत ब्रीजवासी ठरला 'राइजिंग स्टार 2' चा विनर
SHARES

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'राईजिंग स्टार सीझन २' गेले काही दिवस प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. १५ एप्रिलला या शो चा फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी दिलीजी दोसांझ, मोनाली ठाकूर, शंकर महादेवन या परिक्षकांना फिनालेच्या स्पर्धकांनी पुन्हा एकदा आपल्या बहरदार परफॉर्मन्सनी आश्चर्यचकीत केलं आणि प्रेक्षकांच्या लाईव्ह व्होटिंगच्या सहाय्याने हेमंत ब्रीजवासी 'राइजिंग स्टार २'चा विजेता ठरला.


रवी दुबेची खास शैली

'राइजिंग स्टार २' च्या फिनालेला हेमंत ब्रिजवसी, विष्णुमाय रमेश, रोहनप्रीत सिंग आणि जावेद अली यांनी अंतीम फेरीत धडक मारली. या तिघांनी अंतिम फेरीत आपले बेस्ट परफॉर्मन्स सादर केले, आणि उपस्थितांची मनं जिंकली. स्पर्धकांबरोबरच कार्यक्रमाचा होस्ट रवी दुबे याने आपल्या खास शैलीतील निवेदनामुळे कार्यक्रमाला चार चांद लावत उपस्थितांचं मनोरंजन केलं.


हेमंतने मारली बाजी

हेमंत ब्रिजवसी, विष्णुमाय रमेश, रोहनप्रीत सिंग आणि जावेद अली यांच्यातील विजेता निवडण्यासाठी प्रेक्षकांना लाईव्ह व्होटींग चा पर्याय देण्यात आला होता. प्रेक्षकांनी लाईव्ह व्होटिंग करत आपला आवडता गायक हेमंत ब्रीजवासीला निवडून दिलं.

शो सुरू झाल्यापासूनच कोण विजयी ठरणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. विष्णुमाय आणि रोहनप्रीत यांना शेवटच्या क्षणी शोमधून इलिमिनेट झाले. त्यानंतर जावेद आणि हेमंतमध्ये विजेती ट्रॉफी जिंकण्यासाठी लढत झाली. यामध्ये हेमंतने बाजी मारली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा