महाराष्ट्राचा फेव्हरेट कोssण?...सैराssट!

 Mumbai
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोssण?...सैराssट!
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोssण?...सैराssट!
See all
Mumbai  -  

मुंबई - चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिकांचे ज्या पुरस्कार सोहळयाकडे विशेष लक्ष असते असा पुरस्कार सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी, असं सगळ्याच कलाकारांना वाटतं. यंदाच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीची मोहोर ‘सैराट’ चित्रपटावर उमटली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू ठरले.

रसिकांनी नोंदवलेल्या सर्वाधिक मतांनुसार इतर विभागांमध्ये फेव्हरेट दिग्दर्शक म्हणून सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सैराट मधील ‘झिंगाट’ आणि ‘आताच बया का बावरलं’ या गाण्यांसाठी अजय - अतुल आणि श्रेया घोषाल यांना गौरवण्यात आलं. फेव्हरेट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार म्हणून आकाश ठोसर आणि नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार रिंकू राजगुरूने पटकावला. फेव्हरेट स्टाईल आयकॉन म्हणून आकाश ठोसरला पुरस्कार देण्यात आला. ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ पुरस्कार अभिनेत्री रिंकू राजगुरूने पटकावला, तर सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी छाया कदम तसेच सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी तानाजी गालगुंडे याला प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळाली. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांना गौरवण्यात आले, तर सर्वोत्कृष्ट गीताचा बहुमान ‘झिंगाट’ने पटकावला.

अभिनेता श्रेयस तळपदे, अमेय वाघचं खुसखुशीत निवेदन, सुखदा खांडकेकरने सादर केलेली ‘गणेशवंदना’, सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, मृणाल ठाकूर यांचे बहारदार नृत्य परफॉमन्स, आकाश ठोसर आणि वैभव तत्ववादी यांचा रॉकिंग डान्स, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे महेश मांजरेकर यांनी सांगितलेले भन्नाट किस्से असा मनोरंजनाचा भरगच्च नजराणा असलेला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा हा नेत्रदीपक सोहळा 19 मार्चला प्रक्षेपित होणार आहे.

Loading Comments