'दबंग'ची आरेवासियांना कमिटमेंट

 Goregaon
'दबंग'ची आरेवासियांना कमिटमेंट
'दबंग'ची आरेवासियांना कमिटमेंट
See all

गोरेगाव - आरे कॉलनीतल्या मद्रास पाडा युनिट नंबर ७ मधल्या रहिवाशांची अभिनेता सलमान खान यानं भेट घेतली. या वेळी त्यानं रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

मद्रास पाडा परिसरात उपलब्ध असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालीय. त्यामुळे स्थानिक उघड्यावरती शौचालयाला जातात. पालिका आणि आरे प्रशासनाकडे वांरवार मागणी करूनही कुणीही लक्ष देत नसल्याचं रहिवाशांनी सलमानला सांगितलं. यावर पालिकेनं परवानगी दिल्यानंतर फिरत्या शौचालयाची सोय रहिवाशांसाठी उपलब्ध करू, असं आश्वासन सलमाननं रहिवाशांना दिलं.

Loading Comments