• विकासासाठी ‘मिजवान समर 2017’
  • विकासासाठी ‘मिजवान समर 2017’
  • विकासासाठी ‘मिजवान समर 2017’
SHARE

सांताक्रुझ पूर्व - येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये रविवारी रात्री ‘मिजवान समर 2017’ हा सोहळा पार पडला. मिजवान हे उत्तर प्रदेशमधील एक छोटे खेडेगाव आहे. ज्याचा विकास करण्याची संकल्पना शबाना आझमी यांचे वडिल कैफी आझमी यांची होती. या उपक्रमाच्या मदतीसाठी अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी रॅम्पवॉक केले. 

मिजवान गावात अशा उपक्रमातून अनेक सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. स्त्रियांच्या विकासासाठी कैफी आझमी यांच्या नावे शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत.

डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला पोषाख परिधान करून हा रॅम्पवॉक करण्यात आला. 

या कार्यक्रमाला अभिनेत्री कोंकना सेन, सुष्मिता सेन, फराह खान, श्रेया सरन, श्यामी खेर, नितु सिंग कपुर आणि अभिनेता कुणाल पांचोली अशा अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या