'सरगम'मध्ये सचिन यांची गाजलेली गीते आणि किड्स स्पेशल एपिसोड

 Mumbai
'सरगम'मध्ये सचिन यांची गाजलेली गीते आणि किड्स स्पेशल एपिसोड
Mumbai  -  

सर्व प्रकारच्या भूमिका लिलया साकारणारे सचिन पिळगांवकर हे सर्वांचे आवडते नट असून त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे. सरगमच्या किड्स स्पेशल एपिसोड मध्ये लहान मुलांबरोबर त्यांच्यातील एक होऊन गाऊ शकतील असं एकचं नाव होत ते म्हणजे सचिन पिळगांवकर. या आठवड्यात १९ एप्रिल आणि २० एप्रिल  रोजी सरगम मध्ये किड्स स्पेशल कार्यक्रम रात्री ९ वाजता रंगणार आहे. या कार्यक्रमामध्ये सचिन त्यांची आजपर्यंत गाजलेली अनेक गाणी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.

सरगम या कार्यक्रमात सचिन प्यार हमे इस मोड पे ले आया, बडे अच्छे लगते है, लागा चुनरी मे दाग , अशी हि बनवाबनवी, माझा मार्ग वेगळा ही गाणी गातील. त्याचप्रमाणे अनेक टॅलेंटेड लहान मुले इतर उत्तोमोत्तम गाण्यांनी सचिनजींना साथ देणार आहेत .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला कोठारे करणार आहे. हा कार्यक्रम दर बुधवारी आणि गुरवारी रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.

Loading Comments