महाराष्ट्राचा सवाई कोण ?

 Prabhadevi
महाराष्ट्राचा सवाई कोण ?

प्रभादेवी - चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित सवाई या खुल्या एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत 7 एकांकिका दाखल झाल्या आहेत. याची प्राथमिक फेरी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडली. यंदा या स्पर्धेचं 30 वं वर्ष असून यामध्ये 36 प्राथमिक एकांकीका सादर झाल्या होत्या.
या अंतिम फेरीमध्ये सिडनेहॅम महाविद्यालयाची 'शामची आई', जागर आर्ट ऑफ नेशनची 'ग्रिड अॅन्ड फियर', सर परशुराम महाविद्यालय पुणेची '300 मिसिंग', नाट्यवाडा औरंगाबादची 'पाझर', जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणेची 'असणं-नसणं' आणि बदलापूर अनुभूती संस्थेची 'इन द सर्च ऑफ' या एकांकीका अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्या आहेत.

याची अंतिम फेरी रविंद्र नाट्य मंदिर येथे 25 जानेवारीला रात्री 9 वाजता सुरू होणार असून ती 26 जानेवारीच्या सकाळी 6 वाजता राष्ट्रगीतानंतर संपणार आहे.

Loading Comments