Advertisement

गुरुनाथच्या अायुष्यात अाली दुसरी शनाया?


गुरुनाथच्या अायुष्यात अाली दुसरी शनाया?
SHARES

लोकप्रिय झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका अाता नवीन वळण घेणार अाहे.  या मालिकेत अातापर्यंत अनेक नवनवीन प्रयोग बघायला मिळाले अाहेत. अाता या मालिकेत अाणखी एक ट्विस्ट येणार असून दुसऱ्या शनायाची एंट्री झाली अाहे. संजना असं या व्यक्तिरेखेचं नाव अाहे.


संजनावर गुरूनाथही फिदा?

संजना शनायाच्या जागी ट्रेनी म्हणून काम पाहणार अाहे. तिने अाॅफिसमध्ये प्रवेश केला असून तिला पाहून गुरुनाथचीही विकेट पडली अाहे. संजनाच्या लूकवर अाॅफिसमधील सर्वज जण फिदा झाले अाहेत. संजनाचं राहणीमान, तिचे कपडे हे शनायाशी मिळतेजुळते अाहेत. त्यामुळे अाता गुरुच्या मनातील शनायाची जागा संजना घेणार? गुरु-शनाया यांच्यातील वादाचे कारण संजना ठरणार? त्यामुळे मालिकेनं घेतलेलं हे वळण नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणार अाहे.


राधिकाचं नवं रूप

राधिकानं अाता अापल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं अाहे. राधिकाला नवं काँट्रॅक्टही मिळालं अाहे. नेहमी साडीत वावरणारी साधिका अाता नव्या लूकमध्ये दिसणार अाहे. त्यामुळे राधिका नवं अाॅफिस उघडणार का? गुरु अाणि शनायाला दिलेलं चॅलेंज राधिका पूर्ण करणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार अाहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा