Advertisement

शर्मिष्ठा, मेघाला ‘बिग बॅास’मध्ये होणार शिक्षा!


शर्मिष्ठा, मेघाला ‘बिग बॅास’मध्ये होणार शिक्षा!
SHARES

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये दररोज काही ना काही घडत असतं. सध्या बिग बॉस यांनी सोपवलेलं ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सुरू आहे. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. नंदकिशोर कार्यामध्ये प्रजेला बरेच टास्क आणि शिक्षा देत आहेत. स्मिता आणि आस्ताद हुकुमशहा नंदकिशोर यांचे रक्षक आहेत. दरम्यान आजच्या टास्कमध्ये शर्मिष्ठा, मेघाला शिक्षा होणार आहे.


'द ग्रेट डिक्टेटर'

टास्कदरम्यान नंदकिशोर यांनी प्रजेला त्यांच्यावर गौरव गीत तसंच जयघोष तयार करायला सांगितलं. त्यानंतर प्रजेला त्यांनी कुठली गोष्ट आजवर केली नाही जी त्यांना या घरामध्ये करायची आहे, असं विचारल्यास प्रजेने एकएक करून आपल्या मनातील गोष्टी हुकुमशहाला सांगितल्या. आजही ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सुरू राहणार आहे. परंतु काल मेघाला बिग बॉसकडून मिळालेल्या आदेशानुसार आज प्रजा हुकुमशहा विरोधात बंड पुकारणार आहे.


हुकुमशहासमोर बंड

बिग बॉस यांनी हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी हुकुमशहासमोर बंड करण्यासाठी प्रजेला काही टास्क दिलं. कारण, जेव्हा प्रजा बंड करते, तेव्हा हुकुमशाही संपुष्टात येते. टास्कनुसार प्रजेनं हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणं, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणं, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणं, हुकुमशहा यांच्या विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणं या गोष्टी करणं अपेक्षित आहे.


यांना शिक्षा होणार

बिग बॉसमध्ये नंदकिशोर म्हणजेच हुकुमशहाच्या पोस्टरवर काळा रंग फासताना आस्ताद मेघाला पकडणार आहे. तसंच मेघाकडे असलेली शाईदेखील हुकुमशहाचे रक्षक जप्त करणार आहेत. त्यामुळे आता हा टास्क कसा पूर्ण होईल? तसंच मेघा आणि शर्मिष्ठाला आज शिक्षा देखील होणार आहे. यावरून प्रजा आणि हुकुमशहा तसंच त्यांचे रक्षक यांच्यामध्ये वाद होताना दिसणार आहे. यामुळे संपूर्ण प्रजा एकत्र येऊन बंड पुकारणार आहे. सई आणि रेशम मिळून कसा पुतळा नष्ट करतील... स्मोक बॉम्ब कसा फोडतील... सई डोक्यावर पाणी ओतण्यामध्ये यशस्वी होईल का? हे देखील पाहायला मिळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा