Advertisement

तू माझा सांगातीसाठी शेखर झाला सिरीयस


तू माझा सांगातीसाठी शेखर झाला सिरीयस
SHARES

प्रत्येक कलाकार हा आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या मालिकेत किंवा सिनेमात आपली व्यक्तिरेखा चांगली साकारली जावी म्हणून कलाकार त्या भूमिकेशी समरस होण्याचा प्रयत्न करतात. अगदी याचप्रकारे आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा शेखर फडके आता एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'तू माझा सांगती' या मालिकेत शेखर 'विठ्ठलपंत कुलकर्णी' म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.


अभिनयातील विविधता

या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संगीत कुलकर्णी यांनी केलं आहे. यापूर्वी शेखरला अनेक मराठी नाटकं, मालिक आणि सिनेमांमध्ये आपण बघितलं आहे. नेहमीप्रमाणे आता या मालिकेतही त्याच्या अभिनयातील विविधता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत त्याने विनोदी भूमिका, तसेच कलर्स मराठीवरील 'सरस्वती' या मालिकेतील 'भिकूमामा' हा विनोदी खलनायक साकारला आहे.


विठ्ठलपंतांची भूमिका

संतांची परंपरा सांगणारी कथा, कलर्स मराठीवरील 'तू माझा सांगाती' या मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेत संत ज्ञानेश्वर यांची महती सांगण्यात येत आहे. याआधी शेखर फडके यांनी आपल्या विनोदी शैलीतल्या भूमिकांनी प्रेक्षकांना हसवलं आहे. ते साकारत असलेली ही विठ्ठलपंतांची भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा