कंगनावर शेखर सुमनचा ट्विटरवार

 Andheri
कंगनावर शेखर सुमनचा ट्विटरवार

मुंबई - अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता शेखर सुमन यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हं काही दिसत नाहीत. उलट या दोघांच्या नात्याला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता निर्माण व्हायला कारणीभूत ठरलाय तो शेखर सुमनचे एक ट्विट. 


शेखरनं कंगनाचं थेट नाव न घेता एक ट्विट नुकतंच केले. "कोकेन सेवन करणारी एक अभिनेत्री आपलं नसलेलं स्टारडम उगीचच मिरवत होती. मात्र ती आता तोंडावर आपटली आहे. बहुधा हाच काव्यगत न्याय असावा," असं शेखरनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शेखरनं अशाप्रकारचं ट्विट करण्यामागचं कारण म्हणजे कंगनाची प्रमुख भूमिका असलेल्या रंगून चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरील अपयश. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या वीकेण्डला अवघे 18 कोटी रुपये कमावले आहेत. हीच संधी साधून शेखरनं कंगनावरील आपल्या जुन्या रागाला पुन्हा एकदा जागृत केलं आहे.

शेखर सुमनच्या या ट्विटवरून नेटिझन्सनी पण त्याला टार्गेट केले. शेखर सुमन विरोधात होणाऱ्या टीकांवर उत्तर देण्यासाठी शेखर सुमन यांचा मुलगा आदित्य सुमन यानेही उडी घेतली. 

Loading Comments