Advertisement

कुंभमेळ्यातून परतल्यानंतर श्रवण राठोड यांना झाला होता कोरोना, मुलाचा खुलाचा

श्रवण राठोड (shravan rathod) यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. निधनानंतर त्यांच्या मुलानं हा खुलासा केला.

कुंभमेळ्यातून परतल्यानंतर श्रवण राठोड यांना झाला होता कोरोना, मुलाचा खुलाचा
SHARES

बॉलिवूडमधील (bollywood) प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील (nadim-shravan) श्रवण राठोड (shravan rathod) यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. कुंभमेळ्यातून परतल्यानंतर त्यांना कोरोना झाला होता, असा खुलासा त्यांचा मुलगा संजीवनं केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रवण हे काही दिवसांपूर्वी हरिद्वार (haridwar) इथं कुंभमेळ्यामध्ये (kumbhmela) सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथून मुंबईला परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती.

एका वृत्तवाहिनीला स्वतः श्रवण यांचा मोठा मुलगा संजीवनं यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘हा हे खरं आहे. माझे बाबा हरिद्वारला कुंभमेळ्यामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि तिथून आल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आणि खूपच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे आम्ही त्यांना एस.एल. रहेजा या रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचबरोबर त्यांच्या शरीरातील काही भाग काम करत नसल्याचंही समोर आलं होतं. आणि शेवटी या सर्व आजारांच्या विळख्यानं त्यांचं निधन झालं.

बाबांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझी, माझा भावाची आणि आईचीसुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये माझ्या भावाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र माझा आणि आईचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता", असं संजीवनं सांगितलं.

सध्या सांगायचं झालं तर श्रवण यांच्या मोठ्या मुलावर आणि पत्नीवर मुंबईच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर छोटा मुलगा दर्शन घरीचं आयसोलेशनमध्ये आहे

नदीम-श्रवण यांच्या जोडीनं नव्वदचा काळ गाजवला आहे. या जोडीने आशिकी, साजन तसेच आमिर खानच्या राजा हिंदुस्तानी आणि शाहरुख खानच्या परदेस चित्रपटात सर्वोत्तम संगीत दिलं आहे. जे आजही आवर्जून ऐकलं जातं. २००० मध्ये विभक्त झाल्यानंतर परत २००९ मध्ये डेविड धवन यांच्या ‘डू नॉट डिस्टर्ब’ साठी त्यांनी संगीत दिलं होतं.



हेही वाचा

बंदिश बँडिट चित्रपटातील अभिनेता अमित मिस्त्रीचं निधन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा