Advertisement

बंदिश बँडिट चित्रपटातील अभिनेता अमित मिस्त्रीचं निधन

इंडियन फिल्म टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिलनं यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरून जारी केली.

बंदिश बँडिट चित्रपटातील अभिनेता अमित मिस्त्रीचं निधन
SHARES

नाटक, बॉलिवूड आणि टीव्हीसह वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता अमित मिस्त्रीचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला. इंडियन फिल्म टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिलनं यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरून जारी केली.

"टॅलेंटेड अभिनेता अमित मिस्त्रीच्या निधनाची धक्कादायक आणि दुखद माहिती मिळाली आहे. त्यांच्या परिवाराला संवेदना, भगवान त्यांच्या आत्म्याला शांती देवो." असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.

अमितच्या निधनावर चित्रपट आणि टीव्हीसह मनोरंजन जगतातील कलाकारांनी शोक व्यक्त केला. विनोदी कलाकार आणि अभिनेते वीर दासनं आपण लवकरच त्याच्यासोबत शूट करणार होतो असं लिहिलं. तर इतर कलाकारांनी सुद्धा त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता अमित मिस्त्रीनं 'क्या कहना' (2000), 'एक चालीस की लास्ट लोकल' (2007), 'शोर इन द सिटी' (2010), 'यमला पगला दीवाना' (2011), 'गली गली चोर है' (2012) आणि 'अ जेंटलमैन' (2017) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

यासोबतच, 'सात फेरों की हेराफेरी', 'दफा 420', 'तेनाली रामा' आणि 'मॅडम सर' अशा टीव्ही सीरियल्समध्ये सुद्धा अभिनय केला होता. गतवर्षी आलेल्या वेब सीरीज 'बंदिश बँडिट्स' मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.हेही वाचा

प्रसिद्ध संगीतकार श्रावण कुमार यांचं कोरोनाने निधन

सलमान खानच्या 'राधे'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा