Advertisement

प्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार यांचं कोरोनाने निधन

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार नदीम - श्रवण जोडीमधील श्रवण कुमार राठोड (६७) यांचं गुरूवारी कोरोनामुळे निधन झालं.

प्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार यांचं कोरोनाने निधन
SHARES

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम - श्रवण जोडीमधील श्रवण कुमार राठोड (६७) यांचं गुरूवारी कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. 

श्रवण यांच्या निधनाची बातमी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली. श्रवण यांना कोरोनाबरोबरच इतर अनेक आजार असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. श्रवण यांच्यावर डॉ. किर्ती भूषण हे उपचार करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हे व्हेंटिलेटवर होते. त्यांना मधुमेहाचा त्रास असून कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्या फुफ्फुसांना इन्फेक्शन झालं होतं.  त्यांचे हृदयही योग्य पद्धतीने काम करत नव्हते. 

बॉलिवूडमध्ये १९९० च्या दशकामध्ये नदीम- श्रवण या संगीतकार जोडीचा दबदबा होता. त्यांनी संगीत दिलेल्या 'आशिकी' सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

या संगीतकार जोडीने 'आशिकी'नंतर, 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नही', 'साथी', 'दिवाना', 'फूल और काँटे', 'राजा हिंदुस्थानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिले.  हेही वाचा 

  1. विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू

  1. 'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा