Advertisement

'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना

महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे.

'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना
SHARES

महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. जवळपास १०० टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. प्रत्येक टँकरमध्ये १५ ते २० टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्राला जवळपास १०० टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. रेल्वेने देशातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणं आणि नावीन्यपूर्ण कामे करुन कठीण काळात देशाची सेवा केली आहे’, असं ट्वीट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे.

राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. त्यानंतर या एक्सप्रेसवरील ७ रिकाम्या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आला. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास ही एक्सप्रेस विझागवरुन रवाना झाली आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ही स्पेशल रेल्वे नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळी ही ट्रेन विशाखापट्टणम इथं दाखल झाल्यानंतर सर्व टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरणे, वजन करणे आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी २० तासांचा अवधी लागू शकतो असं सांगण्यात आलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा