Advertisement

विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू

विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू
SHARES

विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

आयसीयू वॉर्डात भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे

  • उमा सुरेश कनगुटकर – स्त्री
  • निलेश भोईर – पुरुष
  • पुखराज वल्लभदास वैष्णव – पुरुष
  • रजनी आर कडू – स्त्री
  • नरेंद्र शंकर शिंदे – पुरुष
  • कुमार किशोर दोषी – पुरुष
  • जनार्धन मोरेश्वर म्हात्रे – पुरुष
  • रमेश टी उपायन – पुरुष
  • प्रवीण शिवलाल गौडा – पुरुष
  • अमेय राजेश राऊत – पुरुष
  • शमा अरुण म्हात्रे – स्त्री
  • सुवर्णा एस पितळे – स्त्री
  • सुप्रिया देशमुख – स्त्री

सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. तसेच या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार- नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा