Advertisement

गानविश्वाच्या अनभिषिक्त सम्राज्ञी...लता मंगेशकर!


गानविश्वाच्या अनभिषिक्त सम्राज्ञी...लता मंगेशकर!
SHARES

प्यार किया तो डरना क्या, आज फिर जीने की तमन्ना है, तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना, दो लफ्जों की है दिल की कहानी... ही गाणी आजही प्रत्येकाच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात जिवंत आहेत. या गाण्यांची बातच काही और होती! प्रेक्षकांच्या मनावर फक्त ही गाणीच नाहीत, तर त्यासोबतच गाणी गाणाऱ्याच्या आवाजाची देखील जादू होती. गेल्या सात दशकांपासून हा मधुर आवाज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आम्ही बोलत आहोत गानसम्राज्ञी लता दीदी यांच्याबद्दल! लता मंगेशकर यांचा आज ८८वा वाढदिवस. आपल्या आवाजाच्या जादूने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींना कोणी ओळखत नाही, असं होणं शक्यच नाही. लता मंगेशकर यांचे मूळ नाव 'लतिका' होते. पण दीनानाथ यांच्या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरून लता हे नाव ठेवले. त्यांचे चाहते मात्र त्यांना 'लता दीदी' या नावानेच ओळखतात.


बालपण...

२८ सप्टेंबर १९२९ साली इंदूर इथल्या शीख मोहल्ला परिसरात लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लता मंगेशकरांची आजी देवदासी आणि आजोबा ब्राह्मण होते. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक, तसेच नाट्य कलावंत होते. वडिलांकडूनच लता दीदींना गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उशा, मीना आणि हृदयनाथ या भावंडांमध्ये लता सर्वात मोठ्या


दीदींचे पहिले गाणे चित्रपटातून केले होते कट!

लता दीदींनी वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीत नाटकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. पण १९४२ साली लता अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. तेव्हा वडिलांचे मित्र आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लता दीदींच्या परिवाराची काळजी घेतली.


सौजन्य


'किती हसाल'(१९४२) या मराठी चित्रपटात लता दीदींनी 'नाचू या गडेखेळू सारी मनी हौस भारी' हे गाणे गायले. पण हे गाणे चित्रपटातून वगळण्यात आले. पण लता दीदींनी आशा कधीच सोडली नाही. त्यानंतर मास्टर विनायक यांनी लताबाईंना नवयुगच्या 'पहिली मंगळागौर'(१९४२) या मराठी चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले 'नटली चैत्राची नवलाई' हे गाणे लतादीदींनी गायले.  

१९४५ साली लता मंगेशकर मुंबईत आल्या. त्यानंतर १९४६ साली त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केले. वसंत जोगळेकरांच्या 'आप की सेवा में' या हिंदी चित्रपटात 'लागू कर जोरी' हे गाणे त्यांनी गायले. लता दीदींना 'महल'(१९४९) या चित्रपटातल्या 'आयेगा आनेवाला' या गाण्यामुळे खरी ओळख मिळाली. हे गाणे लतादीदींच्या कारकिर्दीसाठी वेगळे वळण ठरले


बारीक आवाज म्हणून मिळाला होता नकार!

१९४८ मध्ये संगीतकार गुलाम हैदरा यांनी लता दीदींना मार्गदर्शन केले होते. गुलाम हैदरा यांनी लताजींची ओळख 'शहीद' चित्रपटावर काम करत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली. पण मुखर्जींनी लता दीदींचा आवाज बारीक म्हणून नाकारला होता. तेव्हा हैदरजींनी नाराजी व्यक्त केली होती. येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटात गाणे गाण्यासाठी विनवण्या करतील, अशा शब्दांत हैदर यांनी राग व्यक्त केला होता.



लता दीदी ते गानसम्राज्ञीपर्यंतचा यशस्वी प्रवास 

१९६०च्या दशकात लता मंगेशकर हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट गायिका म्हणून नावारुपाला आल्या. १९६० मध्ये 'प्यार किया तो डरना क्या' हे 'मुगल--आजम'(१९६०) या चित्रपटातले त्यांनी गायलेले गाणे तुफान हिट झाले. त्यानंतर 'अजीब दास्ताँ है ये' आणि 'दिल अपना प्रीत पराई' ही गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतरची लता दीदींनी गायलेली अनेक गाणी अजरामर झाली.  


पंडित जवाहार नेहरूही झाले भावूक!

२७ जून १९३६ साली भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादीदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले 'एे मेरे वतन के लोगो' हे देशभक्तीपर गीत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहेरू यांच्या उपस्थितीत गायले. लताजींच्या सुमधुर कंठातून ते गीत ऐकून पंडितजींचेही डोळे पाणावले होते.

लतादीदींनी आत्तापर्यंत ३० हजाराहून अधिक गाणी गायली आहेत आणि आजही त्यांचा आवाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. यासोबतच अनेक अल्बममधल्या गाण्यांना देखील त्यांनी आपला आवाज दिला आहे. 


१) प्यार किया तो डरना क्या



२) आज फिर जीने की तमन्ना है

 


३) सत्यम शिवम सुंदरम



४) तेरे बिना जिया जाए ना

 


५) दिखाई दिए यू



६) तेरी बिंदिया रे



७) मुझे खबर थी वो मेरा नहीं (अल्बम)





डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा